आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5व्या मजल्यावरुन उडी घेऊन जर्नलिस्टने दिला जीव, मार्चमध्ये केले होते स्टिंग ऑपरेशन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पूजा एका इंग्रजी वेब पोर्टलच्या पत्रकार होत्या. - Divya Marathi
पूजा एका इंग्रजी वेब पोर्टलच्या पत्रकार होत्या.
इंदूर/फरीदाबाद (हरियाणा) - मध्यप्रदेशातील इंदूरच्या पत्रकार पूजा तिवारी यांचा रविवारी रात्री हरियाणातील फरीदाबादमधील सेक्टर-46 मधील सद्भावना अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावरुन पडून संदिग्ध अवस्थेत मृत्यू झाला. पूजा एका वेब पोर्टलच्या पत्रकार होत्या. ही घटना घडली तेव्हा तरुणीसोबत एक पत्रकार मित्र आणि फरीदाबाद पोलिस लाइनमधील एक इंस्पेक्टर उपस्थित होते. ही आत्महत्या आहे की हत्या होती याचा तपास पोलिस करत आहेत.

मुलीच्या मृत्यूनंतर काय म्हणाले वडील
- पूजा यांचे वडील रवी तिवारी यांच्या तक्रारीवरुन सूरजकुंड पोलिस स्टेशनमध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी प्रमुख डॉ. अनिल गोयल, त्यांची पत्नी अर्चना गोयल आणि आणखी एका डॉक्टरविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
- पूजा आणि त्यांचा पत्रकार मित्र अनुज मिश्रा यांनी मार्चमध्ये भ्रण हत्येसंदर्भात स्टिंग ऑपरेशन केले होते.
- या दरम्यान, डॉ. अर्चना यांनी पूजा यांच्यावर दोन लाखांच्या खंडणीची मागणीचा आरोप केला होता, तो त्यांनी फेटाळला होता.
पुढील स्लाइडमध्ये,
>> पूजा यांनी सोशल मीडियावर शेअर केली होती डॉक्टरविरोधातील स्टिंगची स्टोरी
>> आयटी अॅक्टखाली एफआयआर दाखल केला होता
>> अमरीन यांनी पोलिसांना काय सांगितले
>> घटनास्थळाचे फोटो
बातम्या आणखी आहेत...