आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RECALL: हे आहेत ज्योतिरादित्यांच्या रॉयल विवाह सोहळ्याचे PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्वाल्हेर - 21 वर्षांपूर्वी ग्वाल्हेर संस्थानाचे महाराज आणि काँग्रेस खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांचा विवाह बडोदा संस्थानची राजकुमारी प्रियदर्शिनी राजे यांच्यासोबत झाला होता. या शाही विवाह सोहळ्याचे काही एक्सक्लूझिव्ह फोटोज् divyamarathi.com घेऊन आले आहे आणि दोन दशकांपूर्वीच्या आठवणी ताज्या करत आहे. सिंधिया संस्थानातील राजकुमाराच्या या लग्नाला राजे-महाराजेंपासून राष्ट्रपती आणि राजकीय नेते हजर होते. ग्वाल्हेरमध्ये झालेल्या समारोहात तीन दिवस जयविलास पॅलेस नागरिकांसाठी खुले होते.

ज्योतिरादित्य विदेशात शिक्षण घऊन भारतात आले होते. त्यांचे वडील माधवराव सिंधिया यांनी बडोदा संस्थानातील राजकुमारी प्रियदर्शनी राजेंसोबत त्यांचा विवाह निश्चित केला. 12 डिसेंबर 1994 रोजी हा शाही विवाह सोहळा झाला. लग्नात राजेशाही थाटात कुठेच कमतरता राहाणार नाही याची काळजी घेण्यात आली होती. राजेशाही परंपराच्या रितीरिवाजाप्रमाणे सर्व विधी पार पडले होते.

संपूर्ण बडोद्याने केले वऱ्हाडींचे स्वागत

ज्योतिरादित्य सिंधिया यांची बडोद्यात जेव्हा वरात निघाली, तेव्हा या वरातीत सहभागी असलेले वऱ्हाडी सांगतात, की बडोद्याच्या महाराजांनी संपूर्ण शहराला नव्या नवरीसारखे सजवले होते. तेथिल प्रत्येक व्यक्ती वऱ्हाडींची स्वागत करत होता. या लग्नाला वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी तत्कालिन राष्ट्रपती शंकरदयाल शर्मांपासून तत्कालिन पंतप्रधान पी.व्ही.नरसिंहराव, सोनिया गांधी यांच्यापर्यंत सर्व उपस्थित होते.
ग्वाल्हेरमध्ये जेव्हा वधू-वराचा स्वागत सोहळा झाला तेव्हा तीन दिवस जयविलास पॅलेसमध्ये नागरिकांसाठी भोजचे आयोजन करण्यात आले होते.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, शाही विवाह सोहळ्याशी संबंधित काही फोटोज्..