आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अावडीची डिश खाऊ घालून समेट घडवणारे जज, परदेशी वृत्तपत्रांनी घेतली दखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यायाधीश गंगाचरण दुबे - Divya Marathi
न्यायाधीश गंगाचरण दुबे
खांडवा (मध्य प्रदेश) - खरगोन शहरातील न्यायाधीश गंगाचरण दुबे हे पक्षकारांना आवडीचे पदार्थ खाऊ खालून त्यांच्यात समेट घडवून देतात. मूळचे सागर येथील दुबे हे सध्या खरगाेन कोर्टात मुख्य न्यायदंडाधिकारी (सीजेएम) आहेत. आवडीच्या डिशद्वारे समेटांसह त्यांनी अनेक आगळे निकाल दिलेले आहेत. एक चारित्र्यावरून संशयाचे प्रकरण होते. त्यात एक तरुण आपल्या मुलाच्या डीएनए चाचणीवर अडून होता. मुलगा आपला नाही, अशी शंका त्याला होती. न्यायाधीशांनी त्याला विज्ञानाच्या पुस्तकावरून बाळाच्या जन्माची प्रक्रिया समजावून सांगितली. शेवटी त्या तरुणाने माघार घेतली. दुबेंवर अनेक परदेशी वृत्तपत्रांनी लेख लिहिलेले आहेत.
जज दुबे यांचे चर्चित किस्से... कौटंुबिक वादातून तुटणारे नातेसंबंध कायम ठेवले
बिर्याणीच्या बेताने जमली बात
सन२०११ मध्ये भोपाळच्या तरुणाविरुद्ध पत्नीने कौटुंबिक छळाची तक्रार दिली होती. उभयतांत तिसऱ्यानेच कलह निर्माण केला होता. वाद घटस्फोटापर्यंत पोहोचला. दुबे यांच्या कोर्टात प्रकरण आल्यावर त्यांनी महिलेला विचारले, तुम्ही दोघे पहिल्यांदा कुठे भेटले काय खाल्ले होते? दोघांचे उत्तर होते - चिकन बिर्याणी. जजने दोघांना पुन्हा तेथेच भेटून तिच डिश खाण्यास सांगितले. दोघेही तेथेच भेटले अन् वाद मिटला. जजदुबेंनी हा फॉर्म्युला "द लास्ट राइड' या हॉलीवूड चित्रपटाच्या कथेतून घेतला. त्यात युगुल असेच मिळतात.

आइस्क्रीमने आणला गोडवा
मुस्लिमतरुणीचा कमी वयातच निकाह झाला. वर्षातच भांडणे होऊ लागली. तलाकची मागणी झाली. जज म्हणाले - तुमचे बायकोवर प्रेम आहे का? तरुण उत्तरला - हाेय, मी तिच्यासाठी जीवही देऊ शकतो. पत्नी म्हणाली - तुम्ही साधे आइस्क्रीमही खाऊ घालत नाही. जजने सांगितले - दिवसांपर्यंत पत्नीला आइस्क्रीम खाऊ घाला पुरावा म्हणून बिल कोर्टात दाखवा. त्याची पूर्तता झाली. दोघांना पुन्हा प्रेम निर्माण झाले घटस्फोटाचा अर्ज मागे घेतला. जजदुबेंनी कायद्याच्या कलमांनुसार विशेष प्रक्रिया बनवून समझोता करवला.

बटाट्याच्या भाजीची जादू
खांडव्याच्यामहिलेने इटारसीतील सासरविरुद्ध हुंड्यासाठी छळाची तक्रार दिली. पतीने समेटाचा तर पत्नीने पोटगीचा अर्ज केला. तीन वर्षे गेली. दुबेंनी त्यांना एकमेकांची आवड विचारली. पत्नी म्हणाली - ह्यांना बटाट्याची भाजी आवडते. दुबेंच्या सांगण्यानुसार दोघे एका दिवसांसाठी घरी गेले. पत्नीने पतीला बटाट्याची भाजी करून खाऊ घातली. दुसऱ्या दिवशी तिने कोर्टात सांगितले - मी केस परत घेत आहे.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, न्यायाधीश गंगाचरण दुबे यांची आणखी छायाचित्रे
बातम्या आणखी आहेत...