आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Junior Editor : Examiner Astonished Children Intelligence

ज्युनियर एडिटर: मुलांची बुद्धीमत्ता पाहून परीक्षकही चकित

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - ज्युनियर एडिटर -2 मोहिमेत सहभागी विद्यार्थ्यांनी आसपास बोकाळलेला भ्रष्टाचार, संसदेतील ‘गोंधळी’ खासदारांचे चित्र अत्यंत सर्जनशील पद्धतीने व समर्पक शब्दांत मांडले. काही मुलांचे कल्पनाविश्व एवढे जिवंत होते की, नुकत्याच घडलेल्या काही घटना त्यांनी जशाच्या तशा कागदावर उतरवल्या. विद्यार्थ्यांच्या या प्रतिभेमुळे परीक्षकही चकित झाले.


दैनिक भास्कर ज्युनियर एडिटर - 2 मोहिमेत सहभागी विद्यार्थ्यांची अंतिम निवड प्रक्रिया येथील दैनिक भास्करच्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये पार पडली. कला व पत्रकारिता क्षेत्रातील तज्ज्ञांच्या समितीने 3.12 लाख ज्युनियर एडिटर्समधून 42 विजेत्यांची निवड केली आहे. यामध्ये महाराष्‍ट्रातील विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. तज्ज्ञांमध्ये माखनलाल चतुर्वेदी पत्रकारिता विद्यापीठातील पत्रकारिता विभागाचे प्रमुख पुष्पेंद्रपाल सिंह, रजिस्ट्रार विवेक सावरेकर मृदुल यांच्याबरोबर ज्येष्ठ चित्रकार अजय शुक्ला, विनय सर्पे आणि तन्मय यांचा समावेश होता. भास्कर समूहाचे व्हाइस प्रसिडेंट विनय माहेश्वरी यांनी सांगितले की, दुस-या टप्प्यात ज्युनियर एडिटरने नवे शिखर गाठले आहे. आगामी काळात पालक व विद्यार्थ्यांची आणखी आवड लक्षात घेऊन भास्कर समूह वाचकांसाठी आकर्षक स्पर्धांचे आयोजन करणार आहे.


ऑक्टोबर 2012 मध्ये ज्युनियर एडिटर मोहीम सुरू झाली. या वर्षी 3 लाख 12 हजार विद्यार्थ्यांनी त्यात सहभाग नोंदवला. अ, ब, क व ड गटात विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. प्रत्येक गटासाठी ठरवून दिलेल्या निकषानुसार विद्यार्थ्यांना एक वाचनीय वृत्तपत्र तयार करण्यास सांगितले होते. पहिल्या टप्प्यात या वृत्तपत्रांची छाननी राज्यस्तरावर करण्यात आली. अंतिम फेरीत निवडक विद्यार्थ्यांच्या वृत्तपत्रांची निवड करण्यात आली होती. यामध्ये 42 जणांची निवड करण्यात आली असून त्यांच्या नावांची घोषणा लवकरच होणार आहे. विजेत्यांची नावे ‘दिव्य मराठी’मध्ये लवकरच प्रसिद्ध करण्यात येतील.


मुलांमध्ये कमालीची सर्जनशीलता पाहावयास मिळाली.’’ पुष्पेंद्रपाल सिंह, विभागप्रमुख- पत्रकारिता, माखनलाल चतुर्वेदी विद्यापीठ


विद्यार्थ्यांमध्ये लहान वयात दूरदृष्टी दिसली.’’
अजय शुक्ला, ज्येष्ठ चित्रकार