आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jyotiraditya Scindia Birthday Today, See Exclusive Photos Of Scindia Palace

B'DAY: ज्योतिरादित्य सिंधिया यांचा रॉयल पॅलेस, आज किंमत आहे अब्‍जावधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ – माजी केंद्रीय मंत्री ज्‍योतिरादित्‍य सिंधिया यांचा आज 44 वा वाढदिवस आहे. वडिल माधवराव सिंधिया यांच्‍याकडून ज्‍योतिरादित्‍यांना राजकारणाचे बाळकडू मिळाले. ज्‍यातिरादित्‍यांच्‍या जन्‍मदिनी आज आम्‍ही तुम्‍हाला त्‍यांच्‍या राजमहालाविषयी सांगणार आहोत.
सिंधीया परिवार आपल्‍या भव्‍य–दिव्‍यतेसाठी ओळखला जायचा. ज्‍योतिरादित्‍य एका मोठ्या पॅलेसमध्‍ये राहतात. जो पूर्वी ग्‍वाल्हेर संस्‍थानचे महाराजा जीवाजी राव यांनी स्‍वातंत्र्यापूर्वी 1 कोटी रुपयांमध्‍ये बांधला होता. ज्‍याची किंमत आज अब्‍जावधीत आहे.
1कोटी रुपयात बांधल्‍या गेला भव्य महल
जय विलास पॅलेसची निर्मिती महाराज जीवाजी राव सिंधिया यांनी 1874 मध्‍ये केली. त्‍यावेळी त्‍यांना एक कोटी रुपयांचा खर्चावे लागले होते. हा महल यूरोपीय आर्किटेक्ट आणि डिझाइनचा अप्रतीम नमुना आहे. या महलाची निर्मिती नाइट-हुड पदवीने सन्‍मानित सर मायकल फिलोसे यांनी केले होते.
आकर्षणाचे केंद्र झुंबर
महलात सिंधिया शासनकालीन काही कागदपत्रे आहेत. सोबतच औरंगजेब आणि शाहजहां यांच्‍या तलवारी आहेत. इटली आणि फ्रांसच्‍या कलाकृती आणि जहाज प्रदर्शनासाठी ठेवले आहे. संग्रहालयात हजारों टनाचे झुंबर आहेत. जे पर्यटकांना आकर्षित करतात.

महलात 400 खोल्‍या
जय विलास पॅलेस 12,40,771 वर्ग फुट परिसरामध्‍ये आहे. ज्‍यामध्‍ये एकूण 400 खोल्‍या आहेत. 40 खोल्‍या संग्रहालयासाठी ठेवण्‍यात आल्‍या आहेत. ज्‍यामध्ये गॅलरी, अस्त्र–शस्त्र, बग्घी आदी वस्‍तू प्रदर्शनीय आहेत. या महलाचे ट्रस्टी ज्योतिरादित्य यांची पत्नी प्रियदर्शनी राजे सिंधिया आहे.

पुढील स्‍लाइडवर पाहा, सिंधियाच्‍या राजमहलची छायाचित्रे....