आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jyotiraditya Scindia School Student Poison News In Marathi

ज्योतिरादित्यांच्या शाळेतील मंत्र्याच्या मुलाने रॅगिंगनंतर घेतले विष, प्रकृती गंभीर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाईल फोटो- ग्वाल्हेरमधील सिंधिया शाळा.)

पाटणा (बिहार)- बिहारचे सहकारमंत्री जयकुमारसिंह यांचा मुलगा आदर्श याला आज (शुक्रवार) दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. ग्वाल्हेरमधील सिंधिया शाळेत आदर्श शिकतो. रॅंगिंगमध्ये तो जबर जखमी झाला होता, अशी माहिती मिळाली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिनिअर विद्यार्थी आदर्शची गेल्या काही दिवसांपासून रॅगिंग घेत होते. यामुळे त्रस्त झालेल्या आदर्शने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याने विष प्राशन केल्याचेही सांगितले जात आहे. सध्या त्याची प्रकृती गंभीर असून त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. याप्रकरणी शाळेच्या प्रशासनाने सोईस्कर मौन धारण केले आहे. दुसरीकडे शाळेचे अध्यक्ष आणि कॉंग्रेस नेता ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आदर्शची रुग्णालयात जाऊन भेट घेतली.
काय आहे प्रकरण
आदर्श नवव्या वर्गात आहे. त्याचा लहान भाऊही याच शाळेत शिकतो. त्याचे मित्र आणि कुटुंबीयांनी सांगितले, की सिनिअर विद्यार्थ्यांनी गेल्या काही दिवसांपासून त्याचे जेवण बंद केले होते. अनेक प्रकारे त्याला त्रास देण्यात येत होता. आज प्रकृती गंभीर असल्याचे समजल्यावर शाळेच्या प्रशासनाने त्याला प्रथम स्थानिक रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर दिल्लीत आणण्यात आले.
आदर्शच्या स्थानिक पालकांनी आरोप लावला आहे, की आदर्शची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आम्हाला देण्यात आली नाही. आम्हाला न सांगता त्याला दिल्लीला नेण्यात आले. त्याची हत्या करण्याचा प्रयत्न झाला असावा.