आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमला नेहरू प्राणिसंग्रहालयातून वाघिणीने दोन वेळा पलायनाचे प्रयत्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर : कमला नेहरू प्राणिसंग्रहालयातून वाघिणीने दोन वेळा पलायनाचे प्रयत्न केले. तिच्या पिंजऱ्याचे दुरुस्ती काम सुरू असल्याने तिने हे प्रयत्न केल्याचे प्राणिसंग्रहालय प्रशासनाने म्हटले आहे. जमुना नामक ही वाघीण पिंजऱ्यातून वाट काढण्यात यशस्वी झाली. या बातमीमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाल्याने प्राणिसंग्रहालय प्रशासन वादात अडकले आहे. अर्ध्या तासात तिला पुन्हा पिंजऱ्यात बंद करण्यात यश आले. कोणतीही अप्रिय घटना घडली नसल्याचे प्रशासनाने सांगितले. सोमवारी प्राणिसंग्रहालय बंद ठेवण्यात आले होते.

प्राणिसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांनी तिला सूचना देऊन दुसऱ्या पिंजऱ्यात कैद करण्यात यश मिळवले, असे मुख्य प्रशासक उत्तम यादव यांनी सांगितले. तिला सूचना कळतात व ती त्यांचे पालनही करते. पिंजऱ्याचे दुरुस्ती काम सुरू असल्याने असे झाल्याचा खुलासा यादव यांनी केला. २७ नोव्हेंबर रोजी देखील ती पिंजऱ्याबाहेर आली होती. कुंपणाहून उडी मारून ती बाहेर आल्याने कर्मचाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली होती. तरीही यासाठी कठोर उपाय योजले गेले नाहीत.
बातम्या आणखी आहेत...