आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 PHOTO मधून पाहा मध्य प्रदेशातील दोन रेल्वे एक्स्प्रेसचा भीषण अपघात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेल्वे टब्यांची अशी अवस्था झाली - Divya Marathi
रेल्वे टब्यांची अशी अवस्था झाली
हारदा- मध्यप्रदेशात हारदा-खिरकियादरम्यान काली माचक नदीच्या पुलावर मंगळवारी रात्री कामायनी एक्स्प्रेसचे 11 तर जनता एक्स्प्रेसचे आठ डबे रुळावरून घसरल्याने झालेल्या भीषण अपघात झाला. या अपघातात 31 जणांचा मृत्यू झाला, तर 50 जण जखमी झाले आहेत. एकाच ठिकाणी दोन्ही रुळांवर अपघात होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

हारदामध्ये प्रचंड मंगळवारी रात्री पाऊस झाला. मांदला गावाला पुराने वेढले. गावाजवळून इटारसी-मुंबई रेल्वेमार्ग जातो. येथेच नदीवर छोटा पूल आहे. रुळाच्या दोन्ही बाजूंना पाणी तुंबलेले होते. त्यामुळे रुळाच्या पिचिंगमध्ये भेगा पडल्या. यामुळे मुंबई ते वाराणसी या कामायनी एक्स्प्रेसचे 11, तसेच जनता एक्स्प्रेसचे डबे घसरले. मृतांपैकी 12 जणांची ओळख पटली आहे. त्यात बहुतांश लोक मध्य प्रदेशच्या नरसिंहपूरचे आहेत. अपघातामुळे मार्गावरून जाणाऱ्या 83 गाड्यांच्या मार्गांत बदल, तर 19 गाड्या रद्द झाल्या आहेत. अपघात मंगळवारी रात्री सुमारे 11.10 वाजता घडला. दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले.
राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी घटनास्थळाची पाहाणी केली. या पॅकेजमधून आम्ही आपल्यासाठी अपघाताचे 10 ताजे फोटो घेऊन आलो आहोत.
पुढील स्लाइडवर पाहा, अपघाताची ताजे फोटो...