आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीना रेल्वे स्टेशनजवळ कामायनी एक्स्प्रेस घसरली; एका दिवसाच्या अंतराने दुसरी दुर्घटना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: रुळाची तपासणी करताना रेल्वे कर्मचारी)

भोपाळ/बीना- मध्य प्रदेशातील बीना रेल्वे स्टेशनजवळ आज (शुक्रवारी) वाराणसी- लोकमान्य तिळक (कुर्ला) 1072 कामायनी एक्स्प्रेसचे इंजिन रुळावरून घसरले. इंजिन 100 मीटरपर्यंत घसरत गेले. पण, गाडीचा वेग कमी असल्याने कोणतीही हानी झाली नाही. मात्र, या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. ही दुर्घटना सकाळी सव्वा दहा वाजेच्या सुमारास घडली.
मिळालेली माहिती अशी की, दुर्घटनेत कामायनी एक्स्प्रेसच्या डब्यांचे कोणतेही नुकसान झाले नाही. रेल्वे इंजिन पुन्हा रुळावर ठेवल्यानंतर जवळपास दुपारी 12 वाजता गाडी रवाना करण्यात आली. एका दिवसाच्या अंतराने दुसरी दुर्घटना घडल्याने विभागीय व्यवस्थापकांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, गुरुवारी (15 जानेवारी) दुर्घटनास्थळी मालगाडीचा एक डबा रुळावरून घसरला होता. त्यानंतर दुसर्‍या दिवशीच कामायाणी एक्स्प्रेसचे इंजिन रुळावरून घसरले. गाडीचा वेग कमी असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
घटनेची माहिती मिळताच भोपाळ रेल्वे विभागाचे डीआरएम दुपारी घटना स्थळी पोहोचले. एक दिवसाच्या अंतराने दोन दुर्घटना घडल्यामुळे या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. प्राथमिक चौकशीत इंजीनियरिंग विभागाला दोषी ठरवण्यात आले आहे.
मिळालेली माहिती अशी की, बीना स्टेशनजवळ असल्याने कामायाने एक्स्प्रेसचा वेग कमी होता. त्यामुळे इंजिनाचे मागील सहा चाके रुळावरून घसरली. जोराचा आवाज झाला आणि गाडी थांबली. घटनेची माहिती मिळताच बीना रेल्वे स्टेशनावरील अधिकारी काही मिनिटांत घटनास्थळी पोहोचले.
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, दुर्घटनेची छायाचित्रे..