आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपबीती: वळून पाहिले तर एक्स्प्रेसचे डबे रुळावरून उतरुन नदीत कोसळले होते!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ- मध्यप्रदेशातील हारदा जिल्ह्यात रेल्वे रुळाखालील भराव धसल्याने दोन रेल्वे एक्स्प्रेसचा भीषण अपघात झाला. कामायनी एक्स्प्रेस आणि जनता एक्स्प्रेसचे काही डबे रुळावरुन घसरले. इतकेच नव्हे तर माचक नदीवरच्या पुलावरुन या दोन्ही रेल्वेचे काही डबे नदीत कोसळले. या भीषण अपघातात आतापर्यंत 28 जणांचा मृत्यू झाला असून 40 जण जखमी आहेत. त्याचप्रमाणे अनेक प्रवाशी बेपत्ता आहेत. जनता एक्स्प्रेसचे इंजिनही वाहून गेले.

मुंबईहून वाराणसीला जाणारी कामायनी एक्स्प्रेस मंगळवारी रात्री 11.45 च्या सुमारास रुळावरुन घसरली तर जबलपूरहून मुंबईला येणारी जनता एक्स्प्रेसही त्याच ठिकाणी घसरली. महत्त्वाचं म्हणजे दोन्ही गाड्यांमध्ये टक्कर झालेली नाही.
अपघातात बचावलेल्या प्रवाशांनी कथन केली आपबिती...
भोपाळ येथील रहिवासी भरत कोळी हे पत्नी सुषमासोबत पाचोरा येथून सायंकाळी सहा वाजता कामायणी एक्स्प्रेसमध्ये बसले. इंजिनपासून ते तिसर्‍या क्रमांकाच्या डब्यात होते. रात्री 11 वाजेच्या सुमारास एक्स्प्रेस हारदापासून 20 किलोमीटर अंतरावर एक मोठा आवाज झाला. त्यामुळे सर्व प्रवाशी घाबरले. एक्सप्रेसला धडक बसल्याचे सुरुवातीला वाटले. काही कळण्याच्या आताच एक्स्प्रेस थांबली. बाहेर काळोख पसरला होता. त्यात पाऊस सुरु होता. मागे वळून पाहिले तर एक नदीचा पूल होता. एक्स्प्रेसचे डबे रुळावरून उतरुन नदीत कोसळले होते. तत्काळ 108 क्रमांकावर फोन करून घटनेची माहिती देण्यात आली. भरत कोळी यांनी आमचे सहयोगी वृत्तपत्र 'दैनिक भास्कर'ला फोन करून अपघाताची माहिती दिली.
टीसी तिकिट चेक करतानाच डब्यात घुसले पाणी
भोपाळचे रहिवासी श्री.कुमावत कामायणी एक्स्प्रेसच्या 'एस-6' डब्यात होते. त्यांनी सांगितले की, अपघात झाला तेव्हा टीसी प्रवाशांचे तिकिट चेक करत होते. डब्यातील बहुतांश प्रवासी झोपले होते. अचानक जोरात आवाज झाला. आवाज होताच डब्यात पाणी घुसले. लोअर बर्थ वर झोपलेले प्रवाशी जागे झाले. 20 मिनिटांत टीसीने एक-एक करून 40 प्रवाशांना डब्यातून बाहेर काढले.

हारदाचे नानक पाटील यांनी सांगितले की, ते जळगावहून बसले होते. एक्स्प्रेस हारदा येथे पोहोचणार होती. हारदा येथे उतरणारे प्रवाशी आपापल्या बॅग सावरत असताना अचानक मोठा आवाज होत प्रचंड झटका बसला आणि एक्स्प्रेस थांबली. डब्यातील प्रवाशी घाबरले. जवळपास चाळीस मिनिटांच्या मोठ्या कसरतीनंतर डब्यातील सर्व प्रवाशी बाहेर निघाले. घटनास्थळापासून चार किलोमिटर अंतरावर असलेल्या कुकरावत गावात सर्व प्रवाशी थांबले आहेत.

धोतराला स्वत:ला बांधुन घेत वाचवला प्राण..
या भीषण अपघातातून बचावलेले मटुक यांनी सांगितले की, त्यांनी स्वत:ला धोतराला बांधून रेल्वे डब्यातून बाहेर निघाले. आरडाओरडीमुळे सर्वत्र हाहाकार उडाला होता. प्रवाशी मदतीसाठी 'बचाव बचाव' अशी हाक मारत होते.

खंडवा येथून रेल्वेत बसलेले शशिभूषण पंडित यांनी सांगितले की, खिरकियाहून एक्स्प्रेस 11 वाजून 07 मिनिटाला निघाली. मांदला आणि भिरंगीदरम्यान रुळावर पाणी होते. एक मोठा झटका बसला आणि काही डबे नदीत कोसळले.

जळगावचे जीतू राजानी यांनी सांगितले की, पूलावरुन इंजिन पार झाले परंतु एस-4 मागील सर्व डबे नदीत कोसळले.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, अपघाताचे फोटो...