आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Karwachouth Indore News Garlico Industry Director Jyoti Garg Indore News

या ब्यूटी क्विन उद्योजिकेने विमानतळावर साजरा केला होता करवा चौथ, जाणून द्या त्यांच्याबद्दल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर - या इंदूरच्या महिला उद्योजिकेने कवेळ आपल्या कार्याच्या जोरावर लौकिक मिळविला नाही तर, सौंदर्य स्पर्धेत सहभागी होऊन आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. त्यासोबतच घर-कुटुंब आणि सणवार साजरे करण्यात कोणत्याही भारतीय महिलेपेक्षा मागे नाही.
आज करवा चौथच्या निमीत्ताने आम्ही तुम्हाला अशा महिलेची ओळख करुन देत आहोत, ज्यांचे जीवन अनेक रंगांनी बहरलेले आहे. गारलिको इंजस्ट्रीच्या संचालक असलेल्या ज्योती गर्ग या यंदा 18 वा करवा चौथ साजरा करत आहेत. विशेष म्हणजे त्या त्यांच्या एका मित्राच्या घरी करवा चौथची पुजा करुन रात्री चंद्र दर्शनानंतर उपवास सोडणार आहेत.
करवा चौथ साजरा करण्यासंदर्भात जेव्हा ज्योती गर्ग यांना आम्ही विचारले, त्या म्हणाल्या, 'माझ्या लग्नाला 18 वर्षे होत आहेत. या 18 वर्षांमध्ये मी कधीही करवा चौथ टाळलेले नाही. मग मी व्यावसायिक कारणामुळे देशात-परदेशात कुठेही असले तरी. एवढ्या वर्षांमध्ये असे अनेक क्षण आले जेव्हा करवा चौथच्या दिवशी मी परदेशात होते. साहाजीकच प्रत्येक वेळी माझे पती अमित गर्ग काही माझ्यासोबतच असतील असे काही नाही. अशा वेळी मी एकटीने चंद्राची पुजा करुन उपवास सोडला आहे.'
पुढील स्लाइडमध्ये वाचा, ज्योती गर्ग आणि त्यांच्या करवा चौथच्या आठवणींबद्दल