आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divyamarathi Readers Help To Kashmir People Thay Will Harass For Flood Situation News In Divyamarathi

'दिव्य मराठी'च्या वाचकांची मदत सामग्री काश्मीरच्या वाटेवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: भोपाळहून निघालेल्या ट्रकला हिरवा झेंडा दाखवताना दैनिकभास्कर समूहाचे अध्यक्ष रमेशचंद्र अग्रवाल)
भोपाळ- जम्मू-काश्मीरमध्ये नुकत्याच आलेल्या पुराने हजारो लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. पुराचे पाणी कित्येक दिवस ओसरत नव्हते. निसर्गाचा प्रकोप चहुबाजूंनी सुरू असल्यामुळे शेकडो गावे जलमय झाली. अनेक घरे जमीनदोस्त झाली. या संकटात बचाव कार्यही सुरू होते. पाऊस आणि पुराचे थैमान काही दिवसांनी थांबले, पण तोवर हजारो लोकांचे सर्वस्व उद्ध्वस्त झाले होते. कुणाचे घर वाहून गेले, तर अनेकांनी माणसे गमावली. आज या लोकांसमोर थंडीचे सर्वात मोठे आव्हान आहे. काही दिवसांतच काश्मीर खोरे पूर्णपणे बर्फाने अच्छादली जाईल. अशा परिस्थितीत या बेघर झालेल्या पूरग्रस्तांना उबदार कपड्यांची सर्वात जास्त आवश्यकता आहे. त्यांची ही गरज ओळखून दैनिक भास्कर समूहाने पूरग्रस्तांपर्यंत उबदार कपडे आणि जीवनावश्यक सामग्री पोहोचवण्याचे ठरवले आणि वाचकांच्या उदंड प्रतिसादातून हे प्रत्यक्षात उतरले.
वाचकांचा उदंड प्रतिसाद
पूरग्रस्तांसाठीउबदार कपडे पोहोचवण्याच्या या मोहिमेला वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला. वाचकांच्या योगदानातून केवळ ११ दिवसात १४ ट्रक भरुन उबदार कपडे एकत्रित झाले. यात स्वेटर, शाल, मफलर इत्यादीचा समावेश आहे. या मोहिमेत विलंब करता जम्मू-काश्मीरमधील गरजूंकडे हे ट्रक रवाना करण्यात आले.
पूरग्रस्तांसोबत सदैव राहू
मध्यप्रदेश, छत्तीसगढ़, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, चंडीगढ़, बिहार आणि झारखंडमधून नव्या ऊबदार कपड्यांनी भरलेले ट्रक जम्मू-काश्मीरकडे रवाना झाले आहेत. वाचकांनी पाठवलेल्या या कपड्यांमुळे पीडितांना दिलासा मिळाला आहे. कठीण प्रसंगी देशभरातील संपूर्ण जनता पीडितांसोबत राहिल, असा संदेश या मोहिमेतून दिला गेला आहे.

टीम भास्करतर्फे वितरण
आपणपाठवलेली मदत सामग्री पूरग्रस्तांना वेळेत हस्तांतरीत होण्यासाठी तयारी सुरु आहे. सामग्रीच्या वितरणासाठी दैनिक भास्कर समूहाची टीम जम्मू-काश्मीरकडे रवाना झाली आहे. त्यामुळे गरजूंपर्यंत आपली मदत अवश्य पोहोचेल आणि वाचकांनी मदतभावनेने पाठवलेल्या साहित्याचे समान वाटप होईल याची शाश्वती आम्ही देतो.