भोपाळ- सन 2011 मधील 'कौन बनेगा करोडपती'च्या (KBC) पाचव्या सीजनमध्ये पाच कोटी रुपये जिंकणारा बिहारचा सुशीलकुमार 'कंगाल' नसल्याचे स्पष्ट झाले आहे. उसणवारी मागणारे मित्र आणि नातेवाईकांना कंटाळून
आपण आर्थिक अडचणीत सापडल्याची अफवा स्वत:च पसरवल्याचे
सुशील कुमारने 'dainikbhaskar.com' शी बोलताना सांगितले.
सुशीलकुमार गुरुवारी मध्यप्रदेशातील नागदा येथील सोमेश सिंह राठोर यांच्या शाळेच्या उद्घाटनाला आला होता. सोमेश राठोर याने KBC मधील एका भागात 25 लाख रुपये जिंकले होते. जिंकलेल्या रुपयांतून सोमेशने शाळा सुरु केली आहे. यावेळी सुशील कुमार याने आपली चूक कबूल केली.
सुशील म्हणाला, पाच कोटी जिंकल्यानंतर देखील आपण आर्थिक अडचणीत सापडलो असल्याचे अफावा स्वत:च मीडियात पसरवली होती. मात्र, त्याच्या मागे मोठे कारण होते. ते कारण म्हणजे, मित्र आणि नातेवाइक सारखे उसणवारी मागण्यासाठी येत होते. यामुळे 'हा' मार्ग अवलंबल्याचे सुशीलने सांगितले.
दरम्यान, सुशीलला KBC कडून 3.6 कोटी रुपये मिळाले. या रुपयांतून सुशीलने स्वत:चा व्यवसाय सुरु केला. भावासाठी ज्वेलरीशॉप सुरु केले. डेअरी उघडली, घर बांधले एवढेच नव्हे तर शेती घेतली. आता माझा व्यवसाय देखील चांगला सुरु आहे. त्यामुळे कंगाल होण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे खुद्द सुशीलने सांगितले. निव्वळ मित्रांचे पैसे मागण्याचे प्रमाण वाढल्यामुळे 'मी करोडपती नसून खाकपती आहे' अशी अफवा पसरवावी लागल्याचे सुशीलने सांगितले.
बिहारमधील मोतिहारी येथील रहिवासी आणि KBCमध्ये पाच कोटी रुपये विजेता सुशील पुन्हा आर्थिक अडचणीत सापडला असल्याचे वृत्त झळकले होते. मात्र, हे वृत्त अफवा असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
ग्रामीण विकास मंत्रालयाचा 'ब्रॅंड अँबेसडर' राहिलेल्या सुशील कुमाराला IAS ऑफिसर होण्याचे स्वप्न होते. मात्र, हे स्वप्न अपूर्ण राहिल्याची खंत देखील सुशीलने व्यक्त केली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, KBC मध्ये पाच कोटी रुपये जिंकणारा सुशीलकुमारची फोटो...