आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेटायला चाललेल्या हार्दिक पटेलला पोलिसांनी घेतले ताब्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हार्दिक पटेल मंगळवारी मंदसौरला चालले होते. पोलिसांनी त्यांना एमपी- राजस्थान सीमेवर रोखले. - Divya Marathi
हार्दिक पटेल मंगळवारी मंदसौरला चालले होते. पोलिसांनी त्यांना एमपी- राजस्थान सीमेवर रोखले.
मंदसौर/भोपाळ- मंदसौर येथे पोलिसांच्या गोळीबारात ठार झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेटायला चाललेल्या हार्दिक पटेल यांना पोलिसांनी मंगळवारी राजस्थान सीमेवरुन ताब्यात घेतले. काँग्रेसचे खासदार ज्योतिरादित्य सिंधिया हे सकाळी इंदौर येथून मंदसौरला रवाना झाले आहेत. पोलिसांनी सिंधिया यामच्या समवेत दुसऱ्या नेत्यांना रोखण्यासाठी 200 पेक्षा जास्त जवानांना तैनात केले आहे. होशंगाबाद येथील सिवनी मालवा येथे एका 68 वर्षीय शेतकऱ्याने झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. माखन लाल दिगोलिया असे या शेतकऱ्याचे नाव 
असून त्याच्यावर 5 लाखाचे कर्ज होते. सीएम शिवराज सिंह चौहान हे बुधवारी मंदसौर आणि पिपलिया बाजारात जाणार आहेत. येथे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 7 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. 
हार्दिकला रोखण्यासाठी पोलिसांनी आधीच केली होती तयारी
- हार्दिक मंगळवारी सकाळी 10 च्या सुमारास राजस्थान-एमपी सीमेलगत असणाऱ्या नयागावात पोहचले होते. त्याच्यासोबत जेडीयूचे राष्ट्रीय महासचिव अखिलेश कटियार सुध्दा उपस्थित होते. हार्दिकने मध्यप्रदेशात प्रवेश करताच तेथे उपस्थित असणाऱ्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. हार्दिक रोखण्यासाठी पोलिसांनी महू-नसीराबाद महामार्ग बंद केला होता. 
- काँग्रेसचे खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांना रोखण्यासाठी जावरा-मंदसौर सीमेवर मालनखेडा टोलनाक्यावर बॅरिक्रेड्स लावण्यात आले आहेत. तेथे 200 हून अधिक जवान तैनात करण्यात आले आहेत. 
बातम्या आणखी आहेत...