आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त 13 कोटींचे मालक आहेत दिग्विजयसिंह, त्यांच्याकडे नाही एकही कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिग्विजयसिंह आणि अमृता - Divya Marathi
दिग्विजयसिंह आणि अमृता
भोपाळ - प्रसिद्ध पत्रकार अमृता रॉय यांच्यासोबत लग्न केल्यामुळे चर्चेत आलेले काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी एका ट्विटमधून टीकाकारांना उत्तर दिले आहे. दिग्विजय यांनी म्हटले आहे, 'माझी पत्नी अमृताने आमची कौटुंबीक आणि वैयक्तिक संपत्तीवरील सर्व अधिकारांचा माझ्या मुलासाठी -जयवर्धनसाठी त्याग केला आहे.' दिग्विजय आणि अमृता यांचा 2015 मध्ये विवाह झाला असल्याची चर्चा होती.

किती आहे राघोगडचे संस्थानिक दिग्विजय यांची संपत्ती

राजघराण्याशी संबंधीत आहेत दिग्विजय
- दिग्विजय सिंह हे मध्यप्रदेशातील राघोगड संस्थानच्या राजपरिवाराचे सदस्य आणि प्रमुख आहेत. त्यांचे कुटुंब आजही राघोगडच्या किल्ल्यात राहाते. राघोगड राजपरिवाराकडे मोठ्या प्रमाणात संपत्ती आहे मात्र दिग्विजयसिंह यांच्या नावावर फक्त 13 कोटी रुपयांची मालमत्ता आहे.
- राज्यसभा निवडणुकीवेळी दाखल केलेल्या शपथपत्रात त्यांच्या संपत्तीचा उल्लेख आला आहे. त्यानुसार ज्या आलिशान किल्ल्यात दिग्विजयसिंह यांचे कुटुंब राहाते त्यातील 2/7 भागावर त्यांचा मालकी हक्क आहे.
- 13 कोटी रुपयांची मालमत्ता असलेल्या दिग्विजयसिंह यांच्याकडे एकही वाहन नाही, हे विशेष.

12 कोटींपेक्षा जास्त स्थावर मालमत्ता
- दिग्विजयसिंह यांनी दाखल केलेल्या शपथपत्रानुसार त्यांच्याकडे 12 कोटी 33 लाख 44 हजार 981 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.
- यात 1677 मध्ये बांधलेला राघोगड किल्ल्याचा 2/7 भाग आणि राघोगडमधील दीड कोटींची व्यावसायिक मालमत्ता आहे.
- याशिवाय झालावाड, भोपाळ आणि राघोगड येथे साडेतीन कोटीरुपयांपेक्षा जास्तची शेत जमीन आहे.

दिल्लीत एक फ्लॅट
- दिग्विजय सिंह यांच्याकडे दिल्लीत 80 लाख रुपये किंमतीचा एक फ्लॅट आहे.
- याशिवाय पाच कोटी रुपयांची मालमत्ता आहे.

एकही गाडी नाही , 3 लाख रुपयांचे सोने
- एवढ्या मोठ्या संस्थानचे राजे असलेले दिग्विजयसिंह यांच्याकडे स्वतःच्या मालकीची एकही गाडी नाही.
- त्यांच्याकडे 100 ग्रॅम सोने आहे. ज्याचे बाजारमुल्य 3 लाख रुपये आहे. 2 लाख रुपये किंमतीची 2 किलो चांदी आहे.
- भोपाळ, राघोगड आणि दिल्ली येथील बँक अकाऊंटमध्ये 56 लाख रुपये जमा आहेत.
- याशिवाय 1 लाख रुपये किंमतीची बंदूक आणि इतर वस्तू आहेत.
- एवढी संपत्ती असूनही त्यांच्यावर 20 लाख रुपयांचे कर्ज आहे.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, लग्नाच्या बातम्यांवर काय म्हणाल्या होत्या अमृता
बातम्या आणखी आहेत...