आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lady Pilot Of Cm Sivraj Singh Chauhan Helicopter

शिवराजसिंग यांच्या हेलिकॉप्टरच्या महिला वैमानिक, गंभीर अपघातातून वाचवले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुख्‍यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरची वैमानिक सोनल वर्मा. - Divya Marathi
मुख्‍यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरची वैमानिक सोनल वर्मा.
भोपाळ - मध्‍य प्रदेशचे मुख्‍यमंत्री शिवराजसिंग चौहान नुकतेच एका अपघातातून बचावले आहेत. त्यांच्या एका भाचीने त्यांचा जीव वाचवला. ही भाची त्यांच्या हेलिकॉप्टरची वैमानिक होती. कॅप्टन सोनल वर्मा गेल्या काही दिवसांपासून मुख्‍यमंत्री शिवराजसिंग यांचे हेलिकॉप्टर उडवत आहे.
शिवराजसिंग चौहान सध्‍या रतलाम आणि देवासमध्‍ये निवडणुक प्रचार करत आहेत. जेव्हा हेलिकॉप्टर हेलिपॅडवर उतरत होते तेव्हा वीज तारांमुळे होणा-या अपघातातून सोनल वर्माने मुख्‍यमंत्र्यांना वाचवले. यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या. या महिला वैमानिकेने हेलिकॉप्टर उतरवताना जवळून जाणा-या विजेचे तार पाहिले होते. तिने लगेच हेलिकॉप्टर आकाशात नेले. एक फेरी मारली आणि सुरक्षित स्थळी मुख्‍यमंत्री शिवराजसिंग यांना उतरवले. तिच्या प्रसंगावधानामुळे एक मोठा अपघात होता होता टळला. घटनेच्या दिवशी कॅप्टन सोनल वर्माचा वाढदिवस होता. तिच्या समयसूचकतेची प्रशंसा मुख्‍यमंत्र्यांनी प्रचारसभेत करुन तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
अमेरिकेत घेतलयं प्रशिक्षण :
सोनल वर्मा ही जबलपूरची रहिवाशी आहे. तिने अमेरिकेतील वैमानिक प्रशिक्षण संस्थेतून प्रशिक्षण घेतले आहे. काही दिवसांपूर्वी तिने पंजाब सरकारचे हेलिकॉप्टरमध्‍ये वैमानिक म्हणून काम केले होते. सध्‍या ती फास्ट हेलिचार्टर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्‍ये वैमानिक आहे. या कंपनीकडून भाजपने निवडणूक प्रचारासाठी हेलिकॉप्टर भाड्याने घेतले आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा संबंधित छायाचित्रे...