आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठगाला भेटली महाठग; या लेडी Politician ने कोटींचा घोळ करणाऱ्याला घातला लाखोंचा गंडा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंकिता शर्मा प्रदेश महिला काँग्रेस सचिव आहे. - Divya Marathi
अंकिता शर्मा प्रदेश महिला काँग्रेस सचिव आहे.
खंडवा/इंदूर - ठगाला महाठग कसे भेटतात हे खंडव्यातील एका प्रकरणात पाहायला मिळाले आहे. मत्स्य व्यवसाय कंत्राटदार सिमरन फिशरीज कंपनीत 1.30 कोटी रुपयांचा घोळ करणारा आरोपी कॅशियर मुकेश छीपा याला एका महिलेने लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. ही महिला प्रदेश महिला काँग्रेसची सचिव असून सध्या फरार आहे.

काय आहे प्रकरण
>> फिसरीज कंपनीत कॅशियर असलेल्या मुकेश छीपाचा घोटाळा उघड झाल्यानंतर त्याला अटकेची भीती सातवत होती.
>> याचा फायदा उचलत मध्य प्रदेश महिला काँग्रेस सचिव अंकिता शर्मा हिने मुकेशची पत्नी नंदिनीला विश्वासात घेतले. तुझ्या पतीला सुखरूप बाहेर काढते, असे आश्वासन देऊन तिने त्यासाठी पैशांची मागणी केली.
>> अंकिता नंदिनीकडून 13 लाख रुपयांचा चेक, 13 लाख रुपये किमतीची महागडी कार, 3 लाख रुपये वकिलाची फीस, दागिणे आणि जमीनीची कागदपत्रे घेऊन फरार झाली आहे.
>> हा सगळा व्यवहार चेकच्या माध्यमातून झाला आहे. एवढीमोठी बनवेगिरी होऊनही नंदिनी किंवा तिच्या पतीने त्याबद्दल ब्र काढला नव्हता. हा सर्व प्रकार पोलिसांनी बँक डिटेल्स चेक केल्यानंतर उघड झाला आहे.
>> काँग्रेसची पदाधिकारी असलेल्या अंकिताने पैसे थेट आपल्या खात्यात जमा न करता आधी नंदिनीच्या नावाने बँक अकाऊंट उघडले आणि चेक द्वारे त्यात पैसे जमा करुन आपल्या नावावर केले. त्यातील एक चेक 13 लाख रुपयांचा होता.
>> नंदिनीचा आरोप आहे की अंकिताने अंतरिम जामीनासाठीही वेगळे पैसे घेतले होते. या प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर पोलिस अंकिताच्या सेठीनगर येथील घरी पोहोचले तेव्हा तिथे कुलूप होते आणि तिचा मोबाइलही बंद आहे. आता तिच्या घराबाहेर पोलिसांनी ट्रॅप लावला आहे.
>> अंकिता शर्माविरोधात 120 बी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दागिणे, गाडी माझ्या नावावर करुन दे, कोणाला शंका येणार नाही...
>> घोटाळ्यात फसल्यानंतर राजस्थानचा रहिवासी असलेल्या मुकेशला तुरुंगात जाण्याची भीती सातावत होती. जेव्हा अंकिताला या प्रकरणाचा सुगावा लागला तिने नंदिनीची भेट घेऊन तिचा विश्वास संपादन केला.
>> अंकिताने सर्वप्रथम नंदिनीच्या नावाने बँक अकाऊंट उघडले. त्यात 13 लाख रुपयांचा चेक जमा केला आणि तो स्वतःच्या खात्यावर जमा करायला लावला.
>> त्यानंतर महागडी कार स्वतःच्या नावावर करुन घेतली आणि नंदिनीला सांगितले की पोलिस चौकशीत कार माझी नाही म्हणून सांगण्यास बजावले.
>> याच पद्धतीने दागिने आणि जमीनीची कागदपत्रेही अंकिताने स्वतःच्या ताब्यात घेतलाचा आरोप नंदिनीने केला.
>> जेव्हा नंदिनी मदत मागण्यासाठी अंकिताच्या घरी गेली तेव्हा तिथे कुलूप होते आणि तिचा मोबाइलही बंद होता. ती कुठे गेली हे कोणालाच माहित नव्हते.
>> खंडवा पोलिस अधीक्षक महेंद्रसिंह सिकरवार यांनी अंकितावर 120 बी अंतर्गत गुन्हा दाखल केला असून अटक केली जाईल असे सांगितले आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, केटरिंग सर्व्हिस चालवणाऱ्या अंकिताचा थाट...