आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या महिलेने वेश्याव्यवसायात जाण्यापासून वाचवल्या अनेक तरुणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(divyamarathi.com 2 ते 8 ऑक्टोबरपर्यंत Joy of Giving Week साजरा करणार आहे. या  दरम्यान आम्ही तुम्हाला अशा व्यक्तींची माहिती देणार आहोत, ज्यांनी दुसऱ्याच्या आनंदाला आपला आनंद मानला.)
 
ग्वाल्हेर (मध्य प्रदेश)- येथील बेडिया आदिवासी हे समाजातील तरुण मुलींना वेश्याव्यवसायात ढकलून त्यांच्या कमाईने घर चालवतात. याला परंपरेशी जोडण्यात आले आहे. पण आता सरकारी आणि समाजसेवी संस्थांच्या प्रयत्नांनी या परिस्थितीत बराच बदल झाला आहे. मुरैना येथील समाजसेवी रामसनेही यांनीही या परंपरेविरुद्ध आवाज उठवला होता. त्यांनी अनेक तरुणींना या परंपरेच्या जाचातून बाहेर काढले होते. त्यासाठी एका आश्रमाचीही स्थापना केली होती. काही वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. आता त्यांची दत्तक मुलगी अरुणा छारी या प्रथेला विरोध करत आहे.
 
बेडिया तरुणींच्या भविष्यासाठी केले नाही लग्न
- समाजशास्त्रात एमए झालेल्या अरुणा छारी यांना बेडिया तरुणी दीदी म्हणतात. त्यांनी अनेक तरुणींना या परंपरेतून मुक्त केले आहे. त्यांना नोकऱ्या मिळवून दिल्या असून चांगले जीवन जगण्याची प्रेरणा दिली आहे.
- अरुणांचा या भागात आदरयुक्त दरारा आहे. त्यांना आदिवासी घाबरतात. तरुणी मात्र त्यांना देवीप्रमाणे समजतात.
 
आश्रमात राहतात तरुणींसह
- अरुणा यांनी अभ्युदय आश्रमाच्या माध्यमातून या परंपरेविरुद्ध आवाज उठवला आहे. केवळ तरुणीच नव्हे तर तरुणांमध्येही याबाबत जनजागृती केली आहे.
- अरुणा यांना समजले, की एखाद्या तरुणीला या परंपरेत ढकलेले जाणार आहे. त्या लगेच त्या तरुणीला या आश्रमात घेवून येतात.
- बऱ्याच वेळा समाजातील लोक त्यांचा विरोध करतात. अशा वेळी पोलिस बोलवून परिस्थिती नियंत्रणात आणली जाते.
 
अरुणा आश्रमात राहुन घडवले करिअर
- अरुणा यांनाही त्यांच्या जन्मदात्या वडीलांनी वेश्याव्यवसायात ढकलले होते. पण रामसनेही यांनी त्यांना वाचवले. आश्रमात आणून एक चांगले जीवन बहाल केले. त्यानंतर त्यांनी तिला मुलीचा दर्जा दिला.
- सध्या या आश्रमात सुमारे २०० तरुण आणि तरुणी आहेत. ते केवळ या परंपरेला विरोध करत नाहीत तर एक चांगले आयुष्य घडवत आहेत.
 
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, इतर फोटो.... 
बातम्या आणखी आहेत...