आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समलैंगिक संबंधाच्‍या दबावाला कंटाळून मुंबईच्‍या युवतीची आत्‍महत्‍या, वाचा सुसाइड नोट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्वाल्‍हेर - एका युवतीवर दोन महिलांनी समलैंगिक संबंधांसाठी दबाव टाकला. या युवतीने Whatsapps वर सुसाइड नोट पाठवून आत्‍महत्‍या केली. आत्‍महत्‍येनंतर पोलिसांनी दोन्‍ही महिलांविरोधात गुन्‍हा दाखल केला आहे. काय आहे प्रकरण....
- ग्वाल्‍हेरच्‍या एका प्रतिष्ठित पब्लिक स्कूलमध्‍ये अकाउंट मॅनेजर म्‍हणून काम करणारी युवती सविता राणे मुरारच्‍या त्यागी नगरात राहत होती.
- मुळची मुंबईची रहिवाशी असलेल्‍या सविताने दोन दिवस आधी तिच्‍या मित्रांना Whatsapps वर एक नोट पाठवली होती.
- या नोटमध्‍ये तिने आपण आत्‍महत्‍या करणार असल्‍याचा उल्‍लेख केला होता.
- सविताने तिच्‍या घरमालकीन असलेल्‍या शुभा श्रीवास्तव आणि सीमा श्रीवास्तव यांनी समलैंगिक संबंधांसाठी दबाव टाकल्‍याचा आरोप केला होता.
- सविताने तक्रार केली नाही म्‍हणून कारवाई केली नसल्‍याचे पोलिसांचे म्‍हणने आहे.
हॉटेलमध्‍ये केली आत्‍महत्‍या....
-सविता रविवारी सायंकाळी नेहमीसाठी मुंबईला जायचे असे सांगत होती.
- मुरार येथून निघाल्‍यानंतर स्टेशनजवळच्‍या एंबियांस हॉटेलच्‍या रूम नंबर 109 मध्‍ये ती थांबली होती.
-सोमवारी सकाळी तिने हॉटेलच्‍या रूममध्‍ये गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली.
-आत्‍महत्‍येपूर्वी तिने लिहीलेल्‍या नोटमध्‍ये घरमालकीनवर काही आरोप केले आहेत.
- आत्‍महत्‍येपूर्वी एक दिवस आधी पोलिसांकडे तक्रार गेली होती मात्र कारवाई झाली नाही.
शुभाने नाकारले आरोप....
-सविताने ज्‍या शुभावर समलैंगिक संबंधांचा आरोप ठेवला तिने आरोप नाकारले आहेत.
- शुभाचे म्‍हणने आहे की, सविता का असे म्‍हणत आहे मला ठाऊक नाही.
- मागील 7 वर्षांपासून ती आमच्‍याच घरात राहत होती.
-अतिरिक्त पोलिस अधीक्षक दिनेश कौशल म्‍हणाले, दोन्‍ही महिलांविरोधात पोलिस कारवाई करत आहेत.
सविता मुंबईची रहिवाशी....
-सविता राणे ही मुंबईची रहिवाशी आहे. नोकरीनिमित्‍त ग्‍वाल्‍हेरमध्‍ये ती कित्‍येक वर्षांपासून राहते.
-तिचा भाऊ उदय राणे मुंबई पोलिसमध्‍ये आहे. मात्र, बहिणीचा मृतदेह ताब्‍यात घेण्‍यास त्‍याने नकार दिला.
- हिच्‍याशी आमचा कोणताही संबंध नसल्‍याचे त्‍याने सांगितले.
-सविताच्‍या आई- वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले.

पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, या आत्‍महत्‍येशी संबंधित काही फोटो.... आणि वाचा तिने लिहिलेली सुसाईड नोट जशीच्या तशी....