आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lady Trainee Sub Inspector Dies In Mysterious Circumstance In Vyapam Scame

व्यापमं: 25 वर्षीय महिला SI चा तलावात मृतदेह, दारू प्यायल्याने अनेकांचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - मध्य प्रदेशातील व्यापमं घाटोळ्याशी संबंधीत लोकांच्या मृत्यूचा सिलसिला काही थांबण्याचे नाव घेत नाही. सोमवारी पाहाटे 5.30 वाजता मध्यप्रदेशातील सागर येथे पोलिस ट्रेनिंग अकादमीतील उप निरीक्षक अनामिका कुशवाहचा मृतदेह संशयास्पदरित्या एका तलावाच्या जवळ आढळला आहे. अनामिकाने आत्महत्या केली असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. भिंड येथील रहिवासी अनामिका कुशवाह 2014 च्या बॅचची उप निरीक्षक आहे. व्यापमची परीक्षा उत्तीर्ण करुन ती सागर येथे प्रशिक्षण घेत होती.

व्यापम घोटाळ्याशी संबंधीत 40 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. ताज प्रकरण एका पत्रकाराच्या मृत्यूचे आहे. शनिवारी टीव्ही जर्नलिस्ट अक्षय सिंह आणि रविवारी जबलपूर मेडिकल कॉलेजचे डीन अरुण शर्मा यांचा दिल्लीतील एका हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू झाला होता.
काँग्रेसने केली सीबीआय तपासाची मागणी
काँग्रेस महासचिव आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह म्हणाले, मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहाण प्रत्येक प्रकरणाच्या सीबीआय तपासाचे आदेश देत असताना याच प्रकरणाला ते नाही का म्हणत आहे ? दुसरीकडे भाजप महासचिव कैलाश विजयवर्गीय म्हणाले, व्यापम घोटाळ्याचा तपास हायकोर्टाच्या नियंत्रणात सुरु आहे. मध्येच तो सीबीआयला दिला गेला तर हायकोर्टाचा अवमान होईल.

काय आहे व्यापम घोटाळा?
मध्य प्रदेशात व्यावसायिक परीक्षा मंडळाने (व्यापम) नोकरभरती केली होती. त्यावेळी सरकारने पैसे देऊन नोकऱ्या वाटल्याचा आरोप झाला होता. या घोटाळ्यात मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहाण यांचेही नाव आहे. व्यापमं घोटाळा हा मध्यप्रदेशातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचे सांगण्यात येते.
व्यापमं घोटाळ्यासंबंधीत लोकांचा मृत्यू कशामुळे केव्हा आणि कुठे झाला याची सविस्तर माहिती
रस्ते अपघातात 10 जणांचा मृत्यू :
नावकिती खटले दाखलमृत्यूची तारीखकसा झाला मृत्यू
अनुज उइके, मंडलादोन14.06.2010रायसेन येथे रस्ते अपघातात
अंशुल सचान, होशंगाबादचार14.06.2010रायसेन येथे रस्ते अपघातात
श्यामवीर यादव, ग्वालियरदोन14.06.2010रायसेन येथे रस्ते अपघातात
आनंद सिंह यादव, फतेहपुरपाच09.10.2013अपघात
अरविंद शाक्य, ग्वाल्हेरएक28.11.2012बसने धक्का दिल्याने
दिनेश जाटव, मुरैनाएक14.02.2014रस्ते अपघात
कुलदीप मरावीएक12.05.2013रस्ते अपघात
तरुण मछार, रतलामएक15.09.2013रस्ते अपघात
देवेंद्र नागर, भिंडएक26.12.2013अटेर येथे अपघात
दीपक जैन, शिवपुरीएक01.02.2014ग्वाल्हेर येथे रस्ते अपघात
अति मद्य प्राशन केल्याने 3 जणांचा मृत्यू :
नावकिती खटले दाखलमृत्यूची तारीखकसा झाला मृत्यू
आशुतोष तिवारी, ग्वालियरतीन10.08.2013अति मद्य प्राशन
ज्ञान सिंह, भिंडआठ20.06.2010अति मद्य प्राशन
विकास सिंह, बड़वानीतीन21.11.2009अति मद्य प्राशन
आत्महत्या :
नावकिती खटले दाखलमृत्यूची तारीखकसा झाला मृत्यू
आदित्य चौधरी, सागरएक25.10.2012गळफास लावून
प्रमोद शर्मा, मुरैनादो21.04.2013गळफास लावून
रविंद्र प्रताप सिंह, सिंगरौलीएक15.06.2014विष प्राशन करुन
बंटी सिकरवार, ग्वाल्हेरएक21.01.2014गळफास लावून
आजारपणामुळे 4 जणांचा मृत्यू :
नावकिती खटले दाखलमृत्यूची तारीखकसा झाला मृत्यू
शैलेष यादव, लखनौएक23.06.2015ब्रेन हॅमरेज
विकास पांडे, अलाहाबादएक20.04.2014ब्रेन हॅमरेज
अनंत राय टागोर, मुरैनाएक07.11.2012कँसरमुळे
प्रेमलता पांडे, रीवाएक17.05.2013कँसरमुळे
इतर कारणांमुळे :
नावकिती खटले दाखलमृत्यूची तारीखकसा झाला मृत्यू
नरेंद्र राजपूत, महोबाएक13.04.2014छातीत दुखत असल्यामुळे
विजय सिंह पटेल, भोपाळदोन28.04.2015कांकेर येथे हॉटेलमध्ये मृतदेह सापडला
नरेंद्र तोमरदोन29.06.2015तुरुंगात संशयास्पद मृत्यू
नम्रता डामोरएक07.01.2012रेल्वे ट्रॅकवर मृतदेह सापडला
तपासासंबंधीत लोकांचा मृत्यू :
नावकुठले होतेमृत्यूची तारीखकसा झाला मृत्यू
डॉ. डी.केे. साकल्लेजबलपुर मेडिकल कॉलेज04.07.2014जळाल्यामुळे
डॉ. अरुण शर्माजबलपुर मेडिकल कॉलेज04.07.2015हॉटेलमध्ये संशयास्पद स्थितीत मृतदेह
पुढील स्लाइडमध्ये, डॉ. शर्मांचा संशयास्पद मृत्यू