आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महात्मा गांधींचे स्वप्न पूर्ण करा, कॉंग्रेसमुक्त भारत करा, नरेंद्र मोदींनी दिला नारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ- देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी कॉंग्रेस बर्खास्त करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांचे अपूर्ण स्वप्न आपण पूर्ण करू, कॉंग्रेसमुक्त भारत करू, असा नारा भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवार) दिला.

महामेळाव्याला संबोधित करताना नरेंद्र मोदी म्हणाले, की कॉंग्रेसशासित केंद्र सरकारमुळे राज्यांच्या कामात आडकाठी निर्माण होते. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे केंद्रात सरकार असताना कोणत्याही राज्य सरकारने कोणतीही तक्रार केलेली नव्हती. परंतु, आता राज्यांच्या तक्रारींचा ढीग लागला आहे. येत्या कोणत्याही निवडणुकांमध्ये कॉंग्रेस आपले उमेदवार उभे करणार नाहीत कारण केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आगामी निवडणुका लढणार आहे.

मोदी म्हणाले, की जनभावना भाजपसोबत आहे. या लाटेवर स्वार व्हा. भाजपला बहुमत मिळवून द्या. जर तुम्हाला गरीब राहायचे नसेल, जर तुमच्या मुलांना चांगले शिक्षण द्यायचे असेल, तर विचार करून मतदान करा.

दरम्यान, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा "नरेंद्रभाई" असा उल्लेख करीत भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी म्हणाले, की मोदींसोबत एका मंचावर उपस्थित राहणे ही अभिमानाची बाब आहे.भारतीय जनता पक्षाचा महामेळावा आज (बुधवार) भोपाळ येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी नरेंद्र मोदी आणि लालकृष्ण अडवाणी एकाच मंचावर आले आहेत. मोदींना पंतप्रधानपदाची उमेदवारी जाहीर झाल्यावर अडवाणी यांच्या गोटात नाराजीचे वातावरण होते. परंतु, आता दोघांमधील संबंध पूर्ववत झाल्याचे दिसून येत आहे. या मेळाव्याला भाजपचे अध्यक्ष राजनाथसिंह, लोकसभेतील विरोध पक्षनेत्या सुषमा स्वराज आदी मान्यवर उपस्थित आहेत.

महामेळाव्याला संबोधित करताना लालकृष्ण अडवाणी म्हणाले, की 2014 च्या निवडणुकांमध्ये भाजपला सर्वांधिक जागा मिळणार आहेत. कधी काळी भाजपला विरोधी पक्ष असे संबोधिले जात असे. परंतु, अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात भाजपने सत्ता स्थापन करून दाखविली आहे. आम्ही भाषणे ठोकून नव्हे तर कामे करून स्वतःला सिद्ध करून दाखविले आहे.

मोदींसंदर्भात बोलताना अडवाणी म्हणाले, की एखाद्या राज्याला 24/7 वीज पुरवठा करणारे नरेंद्र मोदी पहिले मुख्यमंत्री आहेत. त्यांच्यासोबत एका मंचावर उपस्थित राहणे ही अभिमानाची बाब आहे.

राजनाथसिंह म्हणाले, की कॉंग्रेसने देशाला मुर्ख बनविले आहे. कॉंग्रेसने देशाच्या जनतेला खोटं बोलून फसविले आहे.

नरेंद्र मोदी भाजपचे पुढील पंतप्रधान आहेत, असे भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी सांगितले.

यावेळी व्यंकय्या नायडू म्हणाले, की नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाचे दमदार उमेदवार आहेत. कॉंग्रेसकडे त्यांच्यासारखा उमेदवार नाही.

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली म्हणाले, की माझ्या अवघ्या आयुष्यात मी एवढा मोठा मेळावा बघितलेला नाही. नरेंद्र मोदी यांचे निवडून येणे जवळपास निश्चित आहे.

पुढील स्लाईडवर बघा... भाजपच्या महामेळाव्याची छायाचित्रे...