आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News Ten Feared Killed In Temple Stampede In Madhya Pradesh

मध्य प्रदेश : कामदगिरी परिक्रमा सोहळ्यात चेंगराचेंगरी, 10 ठार, 25 जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : कामदगिरी परिक्रमा करणारे भावीक.

भोपाळ (मध्य प्रदेश) - मध्य प्रदेशच्या सतना येथे मंदिराच्या परिसरात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 10 भावीक ठार झाले आहेत. मृतांमध्ये पाच महिला भावीकांचाही समावेश आहे. तसेच 25 भावीक जखमीही झाले आहेत. जखमींना मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता असल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.

सकाळी सहा वाजेच्या सुमारास भावीक कामद गिरी परिक्रमा करत असताना ही दुर्घटना घडली. प्रशासनाने योग्य व्यवस्था न केल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. समोवती अमावस्या असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर भावीक या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सतना येथे आले होते. पण सोहळ्याची तयारी करताना भावीकांच्या संख्येचा विचार करण्यात आला नव्हता. मृतांच्या नातेवाकाला दोन लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा करण्यात आली आहे.