आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राधेमाँविरोधात भोपाळमध्ये वकिलांची तक्रार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ- हुंड्यासाठी शोषण तसेच अश्लीलता पसरवल्याच्या आरोपावरून अडचणीत आलेल्या वादग्रस्त अध्यात्म गुरू राधे माँ यांच्याविरोधात येथील कमलनगर ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यात धार्मिक भावना दुखावल्याचा व देवी शब्दाची बदनामी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

भोपाळ येथील वकील आर. के. पांडे यांनी दिलेल्या लेखी तक्रारीनुसार राधेमाँच्या विरोधात अश्लीलता पसरवणे, स्वत:ला देवीचा अवतार असल्याचे जाहीर करून भाविकांच्या भावना दुखावणे, आई या शब्दाचा अपमान केल्याचा आरोप असून त्यांच्यावर विविध कलमांनुसार खटला दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

पांडे यांच्यासह भोपाळ येथील १९ वकिलांनी त्यासाठी ठाण्यात धाव घेतली होती. पोलिसांनी त्यांना तपास करुन कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. पोलिसांनी राधे माँच्या विरोधात गुन्हा दाखल न केल्यास सोमवारी येथील जिल्हा न्यायालयात राधे माँच्या विरोधात दावा दाखल करण्याचा इशारा वकिलांनी दिला आहे. पांडे यांनी याआधी सानिया मिर्झा, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, लालूप्रसाद यादव, अर्जून सिंह, लालकृष्ण अडवाणींसह अनेकमान्यवरांविरोधात विविध प्रकरणांत याचिका दाखल केल्या आहेत.