आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Narottam Mishra: Election Commission Disqualified Madhya Pradesh Health Minister Over Paid News Case

शिवराजसिंह सरकारमधील मंत्र्यावर तीन वर्षांची निवडणूक बंदी, निवडणूक खर्चात केली होती अफरातफरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मिश्रा यांची तक्रार करणारे भारती हे 2008 मध्ये दतिया विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार होते. - Divya Marathi
मिश्रा यांची तक्रार करणारे भारती हे 2008 मध्ये दतिया विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार होते.
नवी दिल्ली - मध्य प्रदेशचे सिंचनमंत्री नरोत्तम मिश्र यांना निवडणूक आयोगाने विधानसभा सदस्यत्वासाठी अपात्र घाेषित केले आहे. दातिया विधानसभा मतदारसंघातून त्यांची निवड रद्द करण्यासोबतच त्यांना तीन वर्षे निवडणूक लढवण्यावरही बंदी लादण्यात आली आहे. २००८ मध्ये विधानसभा निवडणुकीतील खर्चाचे चुकीचे विवरण दिल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. त्यात पेड न्यूजचाही समावेश आहे. या निर्णयामुळे मिश्र यांना मंत्रिपड सोडावे लागेल, तसेच २०१८ ची विधानसभा निवडणूकही लढवता येणार नाही. 
 
काँग्रेसचे माजी आमदार राजेंद्र भारती यांनी २००९ मध्ये नरोत्तम मिश्र यांच्याविरुद्ध ही याचिका दाखल केली होती. मिश्र यांनी २००८ च्या निवडणूक खर्चाचे अचूक विवरण सादर केले नाही, असा दावा भारती यांनी याचिकेत केला होता. याची चौकशी झाली तेव्हा तपासात तो खरा ठरला. त्यांच्याशी संबंधित या काळातील काही प्रकाशित मजकूरही पेड न्यूजच्या कक्षेत आढळला.
 
हायकोर्टात गेले होते प्रकरण 
- निवडणूक आयोगाने भारती यांच्या तक्रारीनंतर जानेवारी 2013 मध्ये मिश्रांना नोटीस बजावली होती. 
- निवडणूक आयोगाच्या कारवाईपासून वाचण्यासाठी मिश्रांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. हायकोर्टाने ती फेटाळून लावली होती. 
- या प्रकरणात आयोगाने फास्ट ट्रॅक कोर्टाप्रमाणे सुनावणी घेत मिश्रा यांनी सादर केलेले सर्व साक्षीदार तपासले होते. 
 
निर्णयाविरोधात कोर्टात जाणार - मिश्रा 
- मिश्रा म्हणाले, 'निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात मी हायकोर्टात अपील करणार आहे. हे 2008 विधानसभा निवडणुकीतील प्रकरण आहे. त्यानंतर 2013 मध्ये मी निवडणूक लढली आणि विजयी झालो आहे. आयोगाने निर्णय सुनावण्यापूर्वी माझी बाजी ऐकून घेतली नाही.'
- मिश्रांची तक्रार करणारे भारती म्हणाले, आयोगाच्या निर्णयाची प्रत अद्याप मला मिळालेली नाही. 
 
कोण आहे नरोत्तम मिश्रा 
- मध्यप्रदेशातील शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारमध्ये नरोत्तम मिश्रा माहिती प्रसारण आणि जल संपदा मंत्री आहेत. ते सरकारचे प्रवक्ते देखिल आहेत. 
- मिश्रा यांची तक्रार करणारे भारती हे 2008 मध्ये दतिया विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार होते. मिश्रा यांच्या निवडणूक खर्चाचा मुद्दा त्यांनी वेगवेगळ्या स्तरावर उपस्थित केला होता. 
बातम्या आणखी आहेत...