आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Leopard Attack Cow On Road, Run Away In Forest After People Reach Site

बिबट्याने गायीची शिकार करून फरफटत नेले जंगलात, पाहा PHOTO

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: खंडवा- इंदूर मार्गावर भर रस्त्यावर गायची शिकार करताना बिबट्या)
इंदूर/करोली- नर्मदानगर ते पामाखेडीदरम्यान जंगलातून आलेल्या बिबट्याने गायीची काही मिनिटांत शिकार केली. नंतर बिबट्या गायीला फरफटत जंगलात ओढत नेले. पुनासा येथील रहिवासी रमेशचंद अजमेरा आणि गिरीश शुक्ला यांनी आपल्या मोबाइलमध्ये हा प्रसंग कैद केला. दोघे सलकनपूर येथ देवी दर्शन घेण्यासाठी जात होते.
गायीवर हल्ला करणार्‍या बिबट्याला पाहातच त्यांनी आपले वाहन थांबवले. त्यांच्याकडे पाहुन बिबट्या देखील गुरगुरला. बिबट्या जंगलात निघून गेल्यानंतर दोघे पुढे निघाले. त्यामुळे खंडवा-इंदूर मार्ग हिंस्त्र प्राण्यामुळे धोकादायक बनला आहे.
दरम्यान, आगरमधील सुठेली गावात बुधवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्यात रेडकू मरण पावले. परंतु, रेडकूवर ब‍िबट्याने नव्हे तर वाघाने हल्ला केल्याचे गावकर्‍यांनी म्हटले आहे. गुरुवारी दुपारी वन विभागाच्या पथकाने जंगलमध्ये वाघाचा शोध घेतला. परंतु, वाघ कुठेही आढळून आला नाही. रात्री साडे वाजेच्या सुमारास बिबट्या दिसला होता. त्यामुळे परिसरात पिंजरा ठेवला असून परिसरातील गावकर्‍यांनी सतर्क राहाण्याचा इशारा वन विभागाचे रेंजर ओ.पी.शर्मा यांनी दिले आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, गायीची शिकार करणार्‍या बिबट्याचे फोटो...