आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Lessons Of Bhagwad Geeta To Be Tought In Urdu Schools

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मदरशांमध्‍ये शिकवणार भागवद् गीतेचे धडे, धार्मिक संघटनांचा विरोध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ- मध्य प्रदेशमधील मदरशांमध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांना आता भगवत गीतेचे धडे शिकावे लागणार आहेत. राज्य सरकारने इंग्रजी आणि उर्दू माध्यमातील पहिली आणि दुसरीच्या अभ्यासक्रमात भागवद् गीतेवर आधारीत धड्यांचा समावेश करणे बंधनकारक केले आहे. तसे परिपत्रक काढून सरकारने अंमलबजावणी सुरु केली आहे. या निर्णयाला आता विरोध होत असून राज्‍य सरकारवर शिक्षणाच्या भगवेकरणाचा आरोपही होत आहे. सरकारने दोन वर्षांपूर्वी असा निर्णय घेतला होता.

मध्य प्रदेशच्या प्राथमिक शिक्षण विभागाने नुकतेच एक परिपत्रक काढले असून या परिपत्रकात उर्दू तसेच इंग्रजी माध्यमात पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना भागवद् गीतेचे धडे शिकवणे बंधनकारक केले आहे. याशिवाय इयत्ता तिसरी ते आठवीपर्यंतच्‍या हिंदी अभ्‍यासक्रमातही गीतेचा समावेश करण्‍यात आला आहे. या विरोधात मध्यप्रदेशमधील मुस्लि‍म आणि ख्रिश्चन संघटनांनी विरोध दर्शवला आहे.

सरकार मात्र निर्णयावर ठाम आहे. गीतेच्या अभ्यासामुळे उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांनाही फायदाच होईल असे सरकारचे म्‍हणणे आहे. अशी सक्ती करणारे देशातील हे एकमेवर राज्‍य ठरेल. सरकारच्‍या निर्णयाविरोधात विवधि धार्मिक संघटनांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. अभ्यासक्रमात गीतेसोबत कुराण आणि बायबलचाही समावेश करण्‍याची मागणी या संघटनांनी केली आहे.