आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दांपत्यासोबतच राहील ‘लिव्ह इन’ पार्टनरही, घर-शेती-जमीनतही निम्मा वाटा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खांडवा (मध्य प्रदेश) - पती-पत्नीसोबतच लिव्ह इन रिलेशनशिप पार्टनरही त्याच घरात राहणार आहे. पार्टनरच्या घर, शेती, जमिनीतील निम्मा वाटाही तिला मिळेल. खांडवा येथील राष्‍ट्रीय लोकन्यायालयाने शनिवारी हा निकाल दिला.
मांधाता येथील बसंत माहुलालचे 10 वर्षांपासून एका महिलेशी लिव्ह इन संबंध होते. त्याने तिला घरातच ठेवून घेतले. पत्नी राजकुमारीने दोन वर्षांपूर्वी तक्रार दिली होती. कौटुंबिक सल्ला केंद्रात प्रकरण सुटू शकले नाही. पती लाइनमन असून न्यायालयाच्या दृष्टीनेही लिव्ह इन पाप नसल्याचे त्याचे म्हणणे होते. एसीजेएम व ग्राम न्यायाधिका-यांनी परस्परसंमतीने शनिवारी समेट घडवून आणला होता.
दोघींसोबत 15-15 दिवस : पती दोघींसोबत 15-15 दिवस राहील. मधल्या खोलीत पती आणि त्याशेजारच्या खोल्यांत पत्नी व लिव्ह इन पार्टनर राहील.
शेतीची वाटणी अशी : अडीच एकरातील सव्वा एकर पत्नीला. उरलेली पतीकडे राहील. त्यात तिघांचा वाटा असेल. कोणालाही शेती विकता मात्र येणार नाही.