आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजरची पगार ८०००, छाप्यात मिळाले नोटांनी भरलेले सुटकेस, १७ बँक अकाऊंट, ६ गाड्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाल/ग्वाल्हेरः मध्यप्रदेशच्या गुना येथे सहकारी समितीचे मॅनेजरच्या दोन ठिकाणांवर शनिवारी लोकायुक्त ग्वाल्हेरच्या टीमने छापा मारला. मॅनेजरविरोधात उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती बाळगल्याची तक्रार होती. ५० किलो चांदी, ६ गाड्या मिळाल्या... 

- अशोक श्रीवास्तव यांना 8000 रुपये पगार आहे. मात्र छाप्यामध्ये त्यांच्या घरातून एक नोटांनी भरलेली सुटकेस सापडली. 
- गुना कँट आणि ग्राम बरखेड्यात शेती आहे. 
- जवळपास 50 किलो चांदी आणि 150 ग्रॅम सोने सापडले. 
- जवळपास 1 कोटी 35 लाख रुपये किमतीचे 45 वीमा दस्ताएवज मिळाले. 
- अशोक जवळ 6 गाड्या, यामध्ये स्कॉर्पियो, बोलेरो, स्विफ्ट आणि टॅक्टर सोबतच दोन दुचाकी आहेत.

मॅनेजरचे 17 बँक अकाऊंट आढळून आले, ज्यामध्ये  15 लाख रुपये जमा आहेत. तसेच 1.5 लाखांचे फिक्स डिपॉझिटसुध्दा सापडले. 
- याशिवाय, अशोकच्या एका घरातून 7.61 लाख  आणि दुसऱ्या घरातून 26000 रुपयांची रोकड मिळाली. 
-  अशोकने दलवी कॉलनीमध्ये आलिशान असे तीन मजली घर बांधले आहे. ज्याची किंमत जवळपास 50 लाख रुपये आहे. तसेच जगदीश कॉलनीत वडीलांचे घर सुध्दा आहे. 

एजंट म्हणून सुरू केले होते काम 
- अशोक श्रीवास्तव 1989 ते 1993 पर्यंत सहकारी बँकेत एजंट म्हणून कामास होते. यानंतर ते तेथे मॅनेजर बनले. 
- लोकायुक्त DSP ने दिलेल्या माहितीनुसार, अशोक यांचा आतापर्यंतच्या पगाराचा विचार करता तो 8 लाख रुपये एवढा आहे. परंतु त्यांच्याजवळ 3  कोटींपेक्षा जास्त किंमतीची संपत्ती सापडली आहे. 

पुढील स्लाईडवर पाहा, छापा मारल्याचे फोटो आणि रक्क्म, ज्वेलरी आणि बरेच काही... 
बातम्या आणखी आहेत...