आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7.5 Kg ची नृसिंह मूर्ती पाण्यावर तरंगली, चमत्कार पाहायला जमली हजारोंची गर्दी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भगवान नृसिंहाची मूर्ती तरंगताना पाहण्यासाठी जमलेला भक्त समुदाय. - Divya Marathi
भगवान नृसिंहाची मूर्ती तरंगताना पाहण्यासाठी जमलेला भक्त समुदाय.
इंदूर/ हाटपिपल्या- डोलग्यारस सणाच्या दिवशी नृसिंह घाटावर भमोरी नदीमध्ये भगवान नृसिंहांची साडेसात किलो वजनी पाषाण मूर्ती तीन वेळा पाण्यावर तरंगली. एकूण तीन वेळा ती तरंगण्यासाठी पाण्यावर सोडण्यात आली होती. मूर्ती तरंगताच घाटावर जमलेल्या जनसमुदायाने भगवान नृसिंहाचा जयजयकार केला. मान्यतेनुसार, मूर्ती तरंगण्याचा अर्थ आहे की, येणारे वर्ष सुख-समृद्धीचे असणार आहे. शनिवारी नृसिंह मंदिरासह सर्व मंदिरांचे पूजारी घाटावर एकत्र जमले आणि त्यांनी नदीत स्नान करून पूजा केली. यानंतर पंडित गोपालदास वैष्णव यांनी दिवा लावून नदीत सोडला. मूर्ती या वेळी पं. वैष्णवद्वारे मंत्रोच्चारासह 3 वेळा पाण्यात सोडण्यात आली, तिन्ही वेळा ती पाण्यावर तरंगली. प्रकाश चौहान यांनी मूर्तीवर असलेल्या पुष्पमालेची बोली लावली.
 
15 हजार लोक जमले  
- हाटपिल्ल्यामध्ये दुपारी 3 वाजेपासूनच घाटावर भक्त जमू लागले होते. घाटावर आणि आसपास तब्बल 15 हजार लोक मूर्ती तरंगवण्याची प्रक्रिया पाहत होते. 
- संध्याकाळी 6 वाजून 12 मिनिटांनी पहिल्यांदा मूर्ती पाण्यात तरंगल्यावर असे वाटले की, लोक भगवान नृसिंह दर्शनासाठी नदीत जाऊन मूर्तीला स्पर्श करूनच दर्शन करू इच्छित आहेत.
- यादरम्यान दुसऱ्यांदा 6 वाजून 14 मिनिटांनी 10 फूट अंतरावर मूर्ती पुन्हा तरंगली. तिसऱ्यांदाही मूर्ती 2 मिनिटे पाण्यावर तरंगत होती.
 
#अशी आहे मान्यता...
- लोकमान्यतेनुसार, प्रति वर्षी डोलग्यारस सणाला मूर्तीला 3 वेळा पाण्यात तरंगवले जाते. जितक्या वेळा मूर्ती तरंगते, त्यावरून येणारे वर्ष कसे असेल याचा अंदाज बांधला जातो.
- 3 वेळा मूर्ती तरंगल्यास येणारे वर्ष सुख-समृद्धीचे असल्याचा अंदाज लावला जातो.

#115 वर्षे जुनी परंपरा
- ज्येष्ठांनुसार, मूर्तीचा इतिहास 115 वर्षे जुना आहे. नृसिंह पर्वताची चारधाम तीर्थयात्रा केल्यानंतर बागली संस्थानाचे पंडित बिहारीदास वैष्णव यांनी पिपल्या गढी येथे मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. 1902 पासून दरवर्षी भाद्रपद शुक्ल एकादशीला मूर्ती पाण्यात तरंगवली जाते.
 
#मागच्या वर्षीही असेच झाले...
- भगवान नृसिंहाची पाषाण मूर्ती मागच्या वर्षीही पाण्यात 3 वेळा तरंगली होती.
- 7.5 किलो वजनी आहे पाषाण मूर्ती.
- 15 हजार लोक बनले साक्षीदार. 
- 03 वेळा तरंगवण्यात आली, तिन्ही वेळा तरंगली.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या चमत्कारी घटनेचे आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...