आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: आधी भरले कुंकू, त्यानंतर प्रेमीयुगुलाने प्राशन केले जहाल विष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ- मध्य प्रदेशच्या छतरपूर जिल्ह्यात काल (शनिवार) सकाळी प्रेमीयुगुलाने विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या दोघांना छतरपुरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे दोघे मामे बहिणभाऊ आहेत. कुटुंबातील लोकांचा त्यांच्या नात्याला विरोध होता. त्यामुळे त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे.
असे आहे प्रकरण
मुलचंद्र कुशवाह (वय 21) आणि त्याच्या मामाची मुलगी राजकुमारी (वय 19) यांचे गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांवर प्रेम आहे. राजकुमारीचे घर मुलचंद्र याच्या गावापासून सुमारे 80 किलोमीटर दूर आहे. पण या अंतरानेही त्यांच्या नात्यात दरी निर्माण झाली नाही. दोघांचे एकमेकांवर अगदी जिवापाड प्रेम आहे.
शुक्रवारी राजकुमारी मुलचंद्र याच्या घरी राहायला आली होती. आत्याचे घर असल्याने मामांनीही तिला विरोध केला नाही. राजकुमारी आणि मुलचंद्र काल सकाळी घरुन निघाले. छत्रसाल म्यूझियमजवळ आले. त्यानंतर दोघांनी म्यूझियमच्या मागे बसून अतुट नात्याची शपथ घेतली. त्याने तिच्या भांगेत कुंकू भरले. तिचे नाव आपल्या हातावर लिहिले. राजकुमारीने हातावर लावलेल्या मेहंदीत मुलचंद्रचे नाव लिहिले होते. यावेळी दोघांनी विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
तेथून जात असलेल्या लोकांना जेव्हा दोघे बेशुध्द अवस्थेत दिसले तेव्हा त्यांनी याची माहिती मुलचंद्रच्या कुटुंबीयांना दिली. त्यानंतर दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, मुलचंद्र आणि राजकुमारीचे फोटो....