आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्यप्रदेशात हायटेंशन टॉवरला गळफास घेवून प्रेमीयुगलाची आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खंडवा- मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील जूनापानी गावाजवळील जंगलात एका प्रेमीयुुगुलाने हायटेंशन टॉवरला गळफास घेवून आत्महत्या केली. गुरुवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. म्हशी चारण्यासाठी गेलेल्या मुलांनी दोघांना साडीच्या फासावर लटकलेले पाहून ग्रामस्थांना सूचना दिली. राम चंपालाल (25) आणि कंचन परसराम (19) अशी दोघांची ओळख पटली आहे.
जूनापानीच्या ग्रामस्थांनी सांगितले की, गुरुवारी म्हशी चारण्यासाठी काही मुले जंगलात गेले होते. त्यांना राम आणि कंचन हायटेंशन टॉवरला लटकलेले दिसले. सूचना मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. दोघांना खाली उतरून शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. एसआय राजेश सेंगर यांच्या नेतृत्त्वाखाली तपास सुरु आहे.
तीन महिन्यांपूर्वीच झाला होता रामचा विवाह...
तीन महिन्यांपूर्वी बिजपुरी येथील एका तरुणीसोबत रामचा विवाह झाला होता. दोघांमध्ये कोणताही वाद नव्हता. दुसरीकडे कंचनचा विवाह एक वर्षापूर्वी राजू मुन्नालाल याच्याशी झाला होता. मात्र, विवाहानंतर सहा महिन्यात कंचन पतीचे घर सोडून माहेरी आली होती. परंतु गुरुवारी राम आणि कंचनने जंगलात सोबत आत्महत्या केल्याने जूनापाणी गावात सगळ्यांनाच आश्चर्याचा झटका बसला आहे.
पुढील स्लाइडवर पाहा, संबंधित फोटो...