ग्वाल्हेर- मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यात 'लव्ह जिहाद'ची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अवाडपुरा येथील एका मुस्लिम तरुणाने हिंदू असल्याचे खोटे सांगून जौरा येथील एका विधवा महिलेशी
विवाह केला. एक महिन्यानंतर बळजबरीने तिला धर्म परिवर्तन करण्यात भाग पाडून तिच्यासोबत पुन्हा निकाह केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. सनी कुशवाह उर्फ आदिल असे आरोपीचे नाव आहे.
पीडिता मंजु कुशवाह ही महिला जौरा येथील एका रुग्णालयात नर्स म्हणून काम करत होती. तेव्हा तिची सनी कुशवाह नामक तरुणासोबत ओळख झाली. सनीने मंजुशी विवाह केला. परंतु एक महिन्यानंतर सनी हा हिंदू नसून मुस्लिम असल्याचे मंजूच्या लक्षात आले. सनीने तिला धर्म परिवर्तन करण्यास बळजबरी केली. तसेच तिच्याशी निकाह केला. या सगळ्या प्रकाराला मंजुने विरोध केला असता तिला जिवे ठार मारण्याची धमकीही दिल्याचे तिने झांसी रोड पोलिसांना सांगितले.
पीडिता मंजू कुशवाह बुधवारी
आपल्या मुलासोबत झांसी पोलिस ठाण्यात पोहोचली होती. पती सनी कुशवाह उर्फ आदिल याच्या विरोधात मंजूने लेखी तक्रारही दिली आहे. यापूर्वी 14 ऑगस्ट रोजी मंजू हिने झांसी रोड पोलिस ठाण्यात एक तक्रार दिली होती. यात हुंड्यासाठी पतीकडून शारीरिक व मानसिक छळ होत असल्याचे मंजूने म्हटले होते. याप्रकरणी पोलिस तपास करत असताना खोटे बोलून मजूंशी विवाह केल्यानंतर बळजबरीने तिचा धर्म परिवर्तन करून पुन्हा तिच्याशी निकाह केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
2006 मध्ये पहिल्या पतीचा मृत्यू...
नाका चंद्रवदनी भागात राहणारी मंजू कुशवाहने सांगितले की, ती गुना येथील रहिवासी आहे. मुरैना जिल्ह्यातील जौरा येथील मुरारी कुशवाह यांच्यासोबत तिचा विवाह झाला होता. परंतु मुरारी यांची 2006 मध्ये मृत्यु झाला होता. त्यानंतर ती जौरा येथील एका रुग्णालयात नर्स म्हणून काम करून निशा आणि आदित्य या दोन मुलांचे संगोपन करत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, डिसेंबर 2013 मध्ये सनीच्या संपर्कात आली होती मंजू ...