ग्वाल्हेर (मध्य प्रदेश)- बहोडापुरमधील रामाजी का पुरा येथील युवती गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता होती. गुरुवारी ही युवती येथील पोलिस ठाण्यात गेली. तीन युवकांनी तिला सक्सेना हॉस्पिटलजवळ सोडले होते, असे सांगितले जात आहे. युवतीने पोलिसांना अद्याप कोणत्याही युवकाची माहिती दिलेली नाही.
तिने सांगितले आहे, की आईसोबत भांडण झाल्यानंतर मी रागात घर सोडून पळून गेली होती. यानंतर तीन दिवस भोपाळ स्टेशनवर राहिली. परंतु, या प्रकरणाची माहिती मिळाल्यावर बजरंग दलाचे कार्यकर्ते पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाले. त्यांनी LOVE JIHAD वर मोठा हंगामा केला.
बजरंग दलाचे कार्यकर्ते मनोज गोडिया, विश्व हिंदू परिषदेचे संजय अग्रवाल, मनोज रजक, सोनू तिवारी आदी कार्यकर्त्यांनी सांगितले, की एका मुस्लिम युवकाने या युवतीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले होते. त्याने आता तिला जिवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे ती त्या युवकाचे नाव सांगत नाही. तसेच मुस्लिम युवकाने धर्मांतरण करण्याचाही प्रयत्न केला होता. यामुळे संशयित मुस्लिम युवकाला आणि त्याच्या साथिदारांना लगेच अटक करण्यात यावी.
पुढील स्लाईडवर बघा, पोलिस ठाण्यात झालेल्या हंगामाचे फोटो....