आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पत्नीकडे एका खास जागी टॅटू गोंदवून घेण्याचा केला आग्रह, एकले नाही तर केले असे हाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर - कॉलेजमधील मित्रासोबतचे प्रेम आणि लग्न एका इंजिनिअरला चांगलेच भोवले आहे. लव्ह मॅरेजच्या चौथ्या दिवशी पतीने आधुनिकता आणि 'Yo जिंदगी'च्या नावाखाली अशाकाही अटी ठेवल्या ज्यामुळे मुलीला अनेक यातनांचा सामना करावा लागला.
पहिले गळ्यावर गोंदवला टॅटू...
- ही कथा सुरु होते जवळपास चार वर्षांपूर्वी, मालवा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून. पीडिता आणि आरोपी पती दोघेही याच कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग करीत असतात.
- आरोपी पतीचे नाव पर्व वार्ष्णेय असून तो पत्नी परीला एक वर्ष सिनिअर होता. दोघांची मैत्री झाली, हळूहळू त्याचे प्रेमात रुपांतर झाले. दोघांनी इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर 15 मे 2016 रोजी आर्यसमाज मंदिरात लग्न केले.
- लग्नाच्या चौथ्याच दिवशी पर्वने परीच्या मनगटावर बळजबरीने त्याचे नाव गोंदवून घेतले. याला तिचा विरोध होता. मात्र त्याने प्रेमाच्या आणाभाका घालत तिला तयार केले.
- त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पर्वने सर्व मर्यादा ओलांडत परीला तिच्या प्रायव्हेट पार्टवर त्याचे नाव गोंदवून घेण्याचा आग्रह केला.
- परीने त्याला विरोध केल्यानंतर आधुनिक जीवन शैलीमध्ये असे केले जाते. तुझे माझ्या वर खरे प्रेम असेल तर तू नक्की माझे ऐकणार ! असे सुनावले.
- त्यानंतरही तिने नाकर दिल्यानंतर पर्वने तिच्यावर हात उचलला. केवळ हातच उचलला नाही तर तिला बेदम मारहाण केली आणि बळजबरीने तिच्या गळ्याखाली स्वतःच्या जन्मतारखेचा टॅटू गोंदवून घेतला.
- नाजूक जागेवर टॅटू गोंदवल्यामुळे तिच्या गळ्याला सूज आली आणि खाणे-पिणेही अवघड झाले.
आई-वडिलांनी दिली मुलाला साथ
- पतीच्या अत्याचाराची मालिका परीने जेव्हा सासू इंदू आणि सासरे गिरीश वार्ष्णेय यांच्याकडे कथन केली तेव्हा त्यांनी मुलाला समजावण्याऐवजी सूनेलाच मारहाण केली आणि तिला माहेरी पाठवून दिले.
- पर्वसोबत राहायचे असेल तर 50 लाख रुपये घेऊन ये, असे तिच्या सासऱ्यांना तिला सांगितले.
- परी माहेरी राहात होती तेव्हा पर्व रोज तिला भेटायला जात होता. तिचे आई-वडिल घरी नसतील तेव्हा तिला मारहाण करायचा.
- याशिवाय रोज परीला अश्लील मेसेजेस पाठवून तिला मानसिक त्रास देत होता.
समेटाचा प्रयत्नही गेला वाया
- पती पर्व आणि सासरच्या लोकांकडून होणाऱ्या शारीरिक, मानसिक छळानंतरही परीने त्याच्यासोबत राहाण्यासाठी सर्व अपमान विसरून समेटाचा प्रयत्न केला.
- त्यासाठी तिने दिल्लीला राहाणारी त्याची बहिण आस्थाला बोलावून घेतले.
- आस्थाने देखिल भावाचीच साथ दिली आणि परीच्या तोंडावर 40 हजार रुपये फेकत, ही घे माझ्या भावासोबत चार रात्र घालवण्याची किंमत. असे म्हणून तिला घरातून काढून दिले.
- या मानहाणीनंतर परीने जिल्हा न्यायालयात पती आणि सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल केली. कोर्टाने तिच्या अर्जाचा सहानुभूतिपूर्वक विचार करुन पती पर्व, सासू इंदू, सासरा गिरीश वार्ष्णेय, नणंद आस्था यांच्याविरोधात कौटुंबिक हिंसेच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
- परीने आधी महिला पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती, त्यावर तिला आपसात समेट करण्याच सल्ला दिला होता.
- या प्रकरणातील गांभीर्य ओळखून कोर्टाने 17 ऑक्टोबर रोजी महिला आणि बाल कल्याण अधिकाऱ्यांना गुप्त चौकशीचे आदेश दिले होते.
- तपास अधिकाऱ्यांनी पीडितेने केलेल्या आरोपांना दुजोरा दिला व 9 नोव्हेंबर रोजी अहवाल कोर्टात सादर केला.
- या अहवालाच्या आधारावर कोर्टाने 21 नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीत आरोपी पती आणि सासू, सासरा, नणंद यांना 27 डिसेंबरला कोर्टात हजर राहाण्याची नोटीस बजावली आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, परीच्या कुठे-कुठे गोंदवले टॅटू..
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...