Home »National »Madhya Pradesh» Love Triangle Man Gave Contract To Kill Lover Of Wife After Watching Her Mobile Indore

पत्नीने मोबाईलमध्ये ठेवला होता प्रियकराचा फोटो, पतीने पाहिल्यावर केले असे काही

पत्नीने मोबाईलमध्ये प्रियकरासोबत ठेवलेला आपत्तीजनक फोटो पाहिल्यावर पतीने या प्रियकराचा...

दिव्य मराठी वेब टीम | Sep 23, 2017, 19:00 PM IST

  • पत्नीचा मोबाईल पाहिल्यावर पतीने तिचा खून करण्याचा निर्णय घेतला.
इंदुर- पत्नीने मोबाईलमध्ये प्रियकरासोबत ठेवलेला आपत्तीजनक फोटो पाहिल्यावर पतीने या प्रियकराचा सुपारी देऊन खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये मिळालेल्या गाडीच्या क्रमांकावरुन पोलिसांनी खून करणाऱ्यांना पकडले तेव्हा हा सगळा प्रकार समोर आला. पोलिसांनी खूनाचा कट रचणाऱ्या या महिलेच्या पतीसमवेत खून करणाऱ्या दोन आरोपींनाही अटक केली आहे.
- अतिरिक्त आयुक्त मनोज राय आणि सीएसपी जयंत राठोड यांनी सांगितले की 13 सप्टेंबरला एमआयजी ठाण्याच्या भागात अयोध्यापुरी कॉलनीत मजीद नावाच्या युवकाचा भरदिवसा खून करण्यात आला होता.
- त्यानंतर पोलिसांनी तपासासाठी या भागातील सगळे सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिले होते. त्यावेळी मजीदचा काही लोक पाठलाग करत होते हे लक्षात आले. त्यांनी यातील एका बाईकचा नंबर शोधुन इस्लामुद्दीन नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशी त्याने सलमान आणि सादिक नावाच्या व्यक्तींसोबत आपण हा खून केल्याचे सांगितले.
इमरोजची पत्नी कशी गेली मजीदच्या जवळ?
- चौकशीत इस्लामुद्दीनने सांगितले की, त्याचा मित्र इमरोज याने मजीदचा खून करण्यास सांगितले होते. त्यासाठी त्याने 5 लाख रुपये खर्च करण्याची तयारी दर्शवली होती. त्यानंतर त्याने सलमानशी संपर्क साधला. सलमानने 5 लाखात हा खून करण्याची तयारी दर्शवली. त्याने त्यासाठी सादिकला सोबत घेतले. इमरोजने यासाठी त्यांना दीड लाख रुपये अगोदर दिले.
- पोलिसांनी इमरोज, सादिक आणि सलमानला पकडल्यावर इमरोजने सांगितले की पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याने त्याने मजीदचा खून घडवून आणला. लग्नापूर्वी इमरोजची पत्नी ही मजीदच्या घरात भाडेकरु म्हणून राहत होती. त्याकाळात त्यांच्यात संबंध निर्माण झाले होते. लग्नानंतर मजीदने इमरोजच्या पत्नीला भेटणे टाळले होते. पण मागील एक वर्षापासून त्यांच्यात पुन्हा संबंध निर्माण झाले.
- इमरोजने सांगितले की, काही दिवसांपुर्वी त्याने मोबाईल पाहिला तेव्हा त्याला पत्नीच्या मोबाईलमध्ये मजीदसोबत केलेली बातचीत, फोटो आणि अन्य आक्षेपार्ह बाबी आढळल्या. त्यानंतर त्याने तिची समजवण्याचा प्रयत्न केला. त्याने मजीदला समजवण्याचाही प्रयत्न केला पण मजीद हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने त्याने इमरोजलाच धमकी दिली. त्यानंतर इमरोजने त्याचा खून घडवून आणण्याचा निर्णय घेतला.
- पोलिसांनी खूनासाठी वापरलेली बाईक, चाकू जप्त केला आहे. सादिक अजून फरार आहे. त्याला लवकरच अटक करु असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती

Next Article

Recommended