आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bride Killed In Marriage Ceremony When Lover Opens Fire In Bhopal

लग्नमंडपातून निघाली होती मराठी डॉक्टर नवरीची अंत्ययात्रा, एकतर्फी प्रेमातून हत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ- डॉक्टर जयश्री नामदेव हत्येप्रकरणी आरोपी अनुराग ऊर्फ गगन नामदेव याला न्यायालयाने आजीवन कारावास आणि पाच हजार रुपयांची शिक्षा सुनावली आहे. 8 मे 2014 रोजी लालघाडीजवळ सुंदरवन कोहिनूर मॅरेज गार्डनमध्ये जयश्रीचे लग्न होणार होते. यावेळी अनुरागने लग्नाच्या स्टेजवर चढून जयश्रीला गोळ्या घातल्या होत्या.
या घटनेनंतर रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच जयश्रीने अखेरचा श्वास घेतला होता. ही घटना होण्यापूर्वी लग्नमंडपात अगदी उत्साहाचे, जल्लोषाचे वातावरण होते. पण क्षणात सगळे पालटले. आनंदाचे रुपांतर दुःखात झाले. जेथून नवरीची पाठवणी होणार होती तेथूनच तिची अंत्ययात्रा काढण्यात आली होती.
त्या दिवशी काय झाले, नवरदेवाचा जबाब...
लग्नापूर्वीचे आमचे फोटोसेशन आटोपले होते. अनुराग तोंडावर पांढरा कापड बांधून स्टेजवर आला. यावेळी त्याचा एकच डोळा दिसत होता. मी काही समजू शकेल, यापूर्वी तो जयश्रीकडे गेला. त्याने बंदूक बाहेर काढली. काही बोलण्यापूर्वी गोळीबार केला. त्यानंतर तो माझ्यावर गोळीबार करणार होता. पण मी धक्का देऊन त्याला स्टेजवरुन खाली पाडले. यावेळी जयश्री रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिला आम्ही रुग्णालयात घेऊन गेलो. परंतु, तिचा आधीच मृत्यू झाला होता.
माझे तिच्यावर खुप प्रेम होते...
माझे जयश्री खुप प्रेम होते, असे अनुरागने पोलिसांना सांगितले. तिला दुसऱ्याच्या गळ्यात वरमाला टाकता बघू शकत नव्हतो. त्यामुळे एका दिवस आधीच तिला ठार मारण्याचा कट रचला होता, असेही त्यांने सांगितले.
तो असा करेल असे वाटले नव्हते
मला वाटले नव्हते, की अनुराम माझ्या मुलीसोबत असे काही कसेल, असे जयश्रीचे वडील घनश्याम यांनी सांगितले. डॉ. जयश्री आणि डॉ. रोहित यांच्या साखरपुड्याचे फोटो फेसबुकवर शेअर करण्यात आले तेव्हा अनुरागच्या एकतर्फी प्रेमाची कल्पना आली होती. अनुराग जयश्रीच्या आत्याचा मुलगा आहे.
पुढील स्लाईडवर बघा, अनुरागने गोळीबार केल्यावर असा उडाला गोंधळ... निघाली डॉ. जयश्रीचे अंत्ययात्रा...