आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रियकराच्या डिमांडला विवाहितेने दिला नकार, संतप्त प्रियकराने उचलले हे पाऊल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर - जावराच्या नवलखामध्ये एका प्रियकराने आपल्या प्रेयसीची धारदार हत्याराने हत्या केली. यानंतर त्यानेही काही अंतरावर जाऊन एका झाडाला मफलरने गळफास घेतला. दोघेही विवाहित असून त्यांना 4-4 मुले आहेत. प्रियकर त्याच्या प्रेयसीला गुजरातला पळवून नेऊ इच्छित होता, परंतु तिने नकार दिला. यामुळे चिडलेल्या प्रियकराने तिचा खून केला. पोलिसांनी प्रकरणाची नोंद घेऊन तपास सुरू केला आहे.

 

असे आहे प्रकरण...
- पिपलौद पोलिसांनुसार नवलखा येथे राहणारी मंजू सकाळी शौचासाठी तलावाच्या किनारी गेली होती. यादरम्यान तिचा प्रियकर भंवरलाल तेथे आला आणि त्याने थेट धारदार चाकूने तिच्यावर हल्ला चढवला. अगोदर त्याने तिच्या डोक्यावर वार केले. ती खाली पडल्यावर तिच्या दोन्ही गाल आणि मानेवारही वार केले. यामुळे मंजूचा जागीच मृत्यू झाला. यानंतर भंवरलालने घटनास्थळापासून काही अंतरावर असलेल्या बाभळीच्या झाडाला मफलरने गळफास घेतला.

- त्याचा मृतदेह लटकलेला पाहून तेथून जाणाऱ्या गावकऱ्यांनी पोलिसांना माहिती कळवली. पोलिसांना घटनास्थळी खुनासाठी वापरलेला चाकू, चपला आणि पाण्याचा डबा आढळला आहे.

 

मंजू 8 वर्षांपासून माहेरी राहत होती 
मंजूच्या वडिलांचे निधन झालेले आहे. तिचे लग्न झाले होते, परंतु  ती 8 वर्षांपासून माहेरीच राहत होती. तिला चार मुले आहेत. दुसरीकडे तिचा प्रियकर यालाही चार मुले आहेत. ही चारही मुले भंवरलालच्या पत्नीकडे गुजरातमध्ये राहतात. भंवरलालही तेथेच काम करायचा. वर्षभरापासून प्रेयसी मंजू कामाचे निमित्त करून त्याला भेटण्यासाठी गुजरातला जायची.
- दोन महिन्यांपूर्वी मंजू गावी परत आली आणि आईसह राहू लागली. एका महिन्याने प्रियकरही आला आणि तिला परत गुजरातला चलण्याचा आग्रह करू लागला, परंतु तिने नकार दिला. यावरून दोघांत भांडणे विकोपाला गेली. यामुळे भंवरलालने तिचा खून करून स्वत:ही आत्महत्या केली. पोलिस सूत्रांनुसार, मंजूचे गावातच आणखी एकाशी अवैध संबंध बनले होते. यामुळे भंवरलाल नाराज होता. पोलिसांनी या प्रेमप्रकरणाची चौकशी गावकऱ्यांकडे केली असता हे सत्य उजेडात आले.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...