आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

५६ वर्षांमध्ये ५२ हजार गाणी लिहिणारा अवलिया

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवपुरी - येथील ६८ वर्षीय सूरज भसीन यांचा अनेक वर्षांपासून कापड व्यवसाय सुरू आहे. त्यांचे वडील नवनीत भसीन भिंड जिल्ह्यात पोलिस अधीक्षक आहेत. व्यवसायाचा भाग म्हणून कापडाचे विविध प्रकार, रंगसंगतीत रमणारे सूरज हिंदी चित्रपट संगीताच्या छंदापोटी दिवसातून आवर्जुन वेळ काढत आहेत. चित्रपटाचे नाव, त्यातील कलाकार त्यांच्यावर चित्रीत झालेले गाणे ते दररोज रोजनिशी लिहित आहेत. वयाच्या बाराव्या वर्षांपासून १९६० मध्ये त्यंाना हा छंद जडला. विविध गाण्यांची माहिती मिळत गेल्याने सूरज शहरातील चित्रपट गीतांचे जाणकार म्हणून ओळखले जातात. ५६ वर्षांत ५६ डायऱ्यांमध्ये ५२ हजारांहून अधिक गाणी त्यांच्या संग्रही आहेत. त्यांच्या रोजनिशीत १९३१ मध्ये प्रसिद्ध पहिला बोलपट आलम आरातील गाण्यापासून आतापर्यंत प्रसिद्ध ११००० पेक्षा जास्त चित्रपटांची माहितीही उपलब्ध आहे.
दरवर्षीएक डायरी : सूरजभसीन यांच्या म्हणण्यानुसार, ते एका वर्षात एक डायरी तयार करतात. त्यात शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची माहिती एका पानावर लिहितात. यामुळे चित्रपटाच्या नावासोबत प्रदर्शन वर्ष, निर्माता, दिग्दर्शक, गीतकार, संगीतकार आदी माहिती असते. यामुळे ते कोणत्याही अभिनेता, अभिनेत्रीचा पहिला चित्रपट कोणता हे सहज सांगू शकतात.

िचत्रपटाच्या पूर्ण युनिटची माहिती
सूरजभसीन यांनी १९६० मध्ये मुगल-ए-आझम पाहिला होता. मुख्य अभिनेत्यांशिवाय सहायक कलाकार, निर्माता-दिग्दर्शकासंबंधी माहिती जाणून घेण्याची इच्छा त्यांना झाली. तेव्हा पहिली डायरी आकारास आली. त्यात मुगल-ए-आझमसंदर्भात संपूर्ण माहिती लिहिली. सूरज लहानपणी रेडिओवरून संगीत ऐकत होते. चित्रपटाच्या संपूर्ण युनिटबाबत माहिती व्हावी, असे वाटल्याने हा छंद कायमचा जडला. विविध मासिकांच्या माध्यमातून माहिती संकलित केली. आज त्यांच्याकडे ५० हजारांहून जास्त गीतांच्या संग्रहाबरोबर हजारो चित्रपटांच्या नोंदी आहेत.
बातम्या आणखी आहेत...