आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुसळधार पावसात जळत होते विमान, गळ्यातील लॉकेटवरुन माधवरावांची पटली होती ओळख

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्वॉव्हेर- 15 वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशात एका भीषण विमान अपघात झाला होता. त्यात देशाने एक ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशातील ग्वॉल्हेर संस्थानचे महाराज माधवराव सिंधिया यांना गमावेले होते. माधवराव सिधिंया यांचा 30 सप्टेंबरला स्मृतिदिन आहे.

मुसळधार पाऊस होता. या पावसात माधवराव यांच्या विमानाने हवेतच पेट घेतला होते. विमान जमिनीवर कोसळले. विमानात बसलेले सर्व लोकांचा होरपळून मृत्यू झाला होता. गळ्यातील सोन्याच्या लॉगेटवरू माधवराव यांच्या पार्थिवाची ओळख पटली होती. माधवराव सिंधिया यांच्या पुण्यतिथिच्या अनुशंगाने त्यांच्याशी संबंधित माहिती आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहे.

विशेष विमानाने जात होते कानपूरला...
- माधवराव सिंधिया 30 सप्टेंबरला 2001 रोजी दिल्लीहून कानपूरला एका रॅलीला संबोधित करण्यासाठी विशेष विमानाने निघाले होते. उत्तर प्रदेशातील भैंसरोली गावाजवळ पोहोचले असता हवेतच त्याच्या विमानाने पेट घेतला.
- आग लागताच त्यांचे विमान एका शेतात कोसळले. त्या दिवशी मुसळधार पाऊस होता. पण, विमानाला लागलेली आग इतकी भीषण होती की पावसातही ते जळतच होते. गावकर्‍यांनी चिखलात जाऊन आग विझवली. पण विमानात बसलेल्या सगळ्यांचा अक्षरश: कोळसा झाला होता.
- त्यात माधवराव सिंधिया यांचा समावेश होता.

गळ्यातील लॉकेटवरून पटली होती माधवराव सिंधिया यांची ओळख..
- विमानात जळून खाक झालेल्या मृतदेहांची ओळख कशी पटवायची, पोलिसांसमोर एक मोठे आव्हान होते. एका मृतदेहाच्या गळ्यात एक लॉगेट होते. त्यावर 'माँ दुर्गा' असे लिहिले होते. अधिक माहिती घेतल्यास ते माधवराव यांचे असल्याचे समजले.
- माधवराव सिंधिया यांचे पार्थिव ग्वॉल्हेर येथे आणण्यात आले.
- जुन्या बनावटीच्या विमानात ब्लॅकबॉक्स नव्हता.

पुढील स्लाइडवर वाचा, आठवडाभर शोकसागरात बुडाले होते ग्वॉल्हेर...

(Pls Note
- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...