आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यांच्या निधनानंतर रडले होते तत्कालिन पंतप्रधान, लॉकेटने पटली होती ओळख

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माधवराव सिंधिया आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी - Divya Marathi
माधवराव सिंधिया आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी
ग्वाल्हेर - सिंधिया राजघराण्याचे सर्वात लोकप्रिय सदस्य माधवराव सिंधिया यांची 30 सप्टेंबर रोजी पुण्यतिथी आहे. 2001 मध्ये विमान अपघातात त्यांचे निधन झाले होते. विमान दुर्घटनेची माहिती जेव्हा लोकांना कळाली तेव्हा माधवरावांच्या मृत्यूच्या बातमीवर कोणाचाही सहजासहजी विश्वास बसला नव्हता. तेव्हा केंद्रात एनडीएची सत्ता होती आणि अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. माधवरावांच्या निधनाचे त्यांना अतिव दुःख झाले होते, याप्रसंगी जनतेने वाजपेयींना प्रथम रडताना टीव्हीवर पाहिले होते. ते म्हणाले होते, नियती एवढी निर्दयी असू शकते हे आज कळाले.
दुर्घटनेवेळी विमानाला आग लागली होती. सिंधिया यांचा मृतदेह ओळखणे अवघड झाले होते.
त्यांच्या गळ्यातील लॉकेटवरुन त्यांची ओळख पटली होती.
माधवराव सिंधिया काँग्रेसचे दिग्गज नेते होते. ते काँग्रेसच्या रॅलीला संबोधित करण्यासाठी दिल्लीहून कानपूरला निघाले होते. उत्तर प्रदेशातील मैनपूरी जिल्ह्यातील भैंसरोली गावावर विमान असताना त्याला आग लागली आणि बटाट्याच्या शेतात विमान कोसळले. तेव्हा जोरदार पाऊस सुरु होता. तरीही विमान जळत होते. गावकऱ्यांनी जळणाऱ्या विमानावर चिखल माती टाकून आग विझवली होती. विमानाचे गेट तोडले तेव्हा आतमध्ये फक्त जळालेले मृतदेह पाहून स्थानिक हैराण झाले होते. त्यांना माहित नव्हते की हे कोण लोक आहेत.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, दुर्घटनेनंतर कसे कळाले माधवराव सिंधियांबद्दल...