आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माधवराव सिंधिया राहात होते या महालात, जयविलास पॅलेसमध्ये आहे 3500 किलोंचे झुंबर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्वॉल्हेर- देशातील मोठ्या संस्थानांपैकी एक असलेले ग्वॉल्हेर संस्थान. नरेश श्रीमंत माधवराव सिंधिया आज हयात नाही. पण त्यांच्या आठवणी अजूनही मनात ताज्या आहेत. आज 30 सप्टेंबरला त्यांचा स्मृतीदिन आहे. या अनुशंगाने divyamarathi.com सांगत आहे त्यांच्या शाही महालाविषयी...

काय विशेषता आहे जयविलास पॅलेसची...
- जयविलास पॅलेस 1874 मध्ये बांधून पूर्ण झाला होता.
- 12 लाख वर्ग फूटांमध्ये असलेला हा महाल पूर्ण पांढराशुभ्र आहे.
- तेव्हा त्याची किंमत 1 कोटी रुपये होती.
- या पॅलेसमध्ये 400 खोल्या आहेत, त्यापैकी आता 40 खोल्यांमध्ये संग्रहालय करण्यात आले आहे.

असा आहे पॅलेसचा दरबार हॉल
- या पॅलेसमध्ये सर्वात प्रशस्त आहे दरबार हॉल.
- जयविलास पॅलेसच्या रॉयल दरबाराच्या छताला 140 वर्षांपासून 3500 किलोंचे झुंबर टांगलेले आहे.
- हे झुंबर जगातील सर्वात मोठ्या झुंबर पैकी एक असून बेल्जियमच्या कारागिरांनी ते तयार केले आहे.
- हे झुंबर टांगण्याआधी इंजिनिअर्सनी छताच्या मजबूतीची परीक्षा घेतली होती. त्यासाठी छतावर 10 हत्ती चढवले गेले होते.
- सात दिवस हत्तींचा मुक्काम छतावर होता. त्यानंतर झुंबर टांगण्यात आले.

डायनिंग हॉलमध्ये चांदीची रेल्वे
- डायनिंग हॉलमध्ये चांदीची रेल्वे आहे, त्यातून पाहुण्यांना जेवण वाढले जाते.
प्रिन्स अॅडवर्ड यांच्या स्वागतासाठी उभारण्यात आला जयविलास पॅलेस
- सिंधिया राजघराण्याचे वंशज जयाजीराव वयाच्या 8 व्या वर्षी ग्वाल्हेरच्या गादीवर बसले होते.
- ते मोठे झाल्यानंतर इंग्लंडचे राजे अॅडवर्ड- VII भारतात येणार होते, जयाजी महाराजांनी त्यांना ग्वाल्हेरला निमंत्रित केले होते.
- त्यांच्या स्वागतासाठीच जयाजी महाराजांनी जयविलास पॅलेस बांधला होता.
- पॅलेसच्या बांधकामासाठी त्यांनी फ्रान्सचा आर्किटेक्ट मिशेल फिलोसची नियुक्ती केली होती. त्याने 1874 मध्ये भव्य राजसी थाटाचा जयविलास पॅलेस उभा करुन दिला.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, 400 खोल्यांच्या भव्य महालातील फोटोज...

(Pls Note-
तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...