आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Madhya Pradesh, Flood, Disaster, Death Struggle, Rescuers. Monsoon

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : हा काही स्टंट नाही... पुरात जीव वाचवण्याची सुरू आहे धडपड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मध्यप्रदेशमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुरस्थिती निर्माण झाली आहे. कित्येक वर्षांचे रेकॉर्ड या पावसाने धुवून काढले आहे. नदी - नाले तुडूंब भरून वाहात आहेत. यामुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. पुरात अडकलेल्या लोकांना वाचवण्यात अनंत अडचणी येत आहेत. त्यामुळे या लोकांना कित्येक तास झाडांवर लटकून राहावे लागत आहे.

या छायाचित्रांमधून मध्यप्रदेशच्या पुरस्थितीची भयावहता स्पष्ट दिसते. गेल्या वर्षी देखील येथील परिस्थिती अशीच होती. मात्र, यंदा ती अधिकच भयावह झाली आहे. राज्याची राजधानी भोपाळमध्ये गेल्या दोन तीन दिवसांपासून सतत पाऊस सुरु आहे. त्यासोबतच बैतूल, शिवपूरी, विदिशा, होशंगाबाद, हरदा, गुना सिहोर, रायसेन या जिल्ह्यांनाही पावसाने झोडपून काढले आहे. रस्त्यांवर पाणीच पाणी झाले असल्यामुळे वाहतूक व्यवस्था वेळोवेळी ठप्प होत आहे.

सोबतचे छायाचित्र हे शाजापूर येथील आहे. जोरदार पावसामुळे एक युवक नदीत वाहून गेला. पुढे झाडाची एक फांदी त्याच्या हातात आली आणि तिच्या आधाराने त्याने जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. गावक-यांनी दोरखंडाच्या मदतीने त्याला वाचवले.