आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTO: नालेसफाईसाठी मुलाला उलटे लटकवले; ठेकेदाराचा अघोरी प्रकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुणा रेल्वेस्टेशनवर विजेचे खांब लावण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी खोदून ठेवलेल्या खड्ड्यात माती, दगड साठल्यानंतर त्याच्या सफाईचे काम सुरू होते. आत मजूर उतरू शकत नसल्याने ठेकेदाराने एक फूट रुंद व आठ फूट खोल खड्ड्यात लहान मुलाला अशा प्रकारे उलटे टांगले. थोड्या वेळाने दम कोंडल्यावर मुलगा जिवाच्या आकांताने ओरडू लागला. आजूबाजूचे लोक जमले. त्यांनी विरोध केल्याने मुलाला तसेच सोडून मजूर, ठेकेदार व पर्यवेक्षक फरार झाले.

या प्रयत्नात मुलाच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा झाल्या. परंतु लोक जमा झाल्यावर त्याला रुग्णालयात नेण्याचे सौजन्यही न दाखवता तसेच जखमी स्थितीत सोडून देण्यात आले.