आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Madhya Pradesh Home Minister Babulal Gaur Touches Woman Inappropriately

VIDEO: महिलेला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणारे होम मिनिस्टर अडचणीत, ट्विटरवर टार्गेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ- बसमध्ये चढणार्‍या एका महिलेला मागच्या बाजूने चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणारे मध्य प्रदेशचे होम मिनिस्टर अर्थात गृहमंत्री बाबूलाल गौर एका नव्या वादात सापडले आहेत. 82 वर्षीय गौर यांचा एक व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. यात ते महिलेला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करताना स्पष्टपणे दिसत आहेत.

या व्हिडिओमुळे गौर यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. 'ट्विटर'वर एका यूजर्सने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करून गौर यांना तडकाफडकी निलंबित करण्‍याची मागणी केली आहे.

काय आहे प्रकरण?
- भोपाळमधील बरखेडा पठाणी भागात नव्या बसेसचे उद्‍घाटन गौर यांच्या हस्ते करण्‍यात आले.
- गौर यांनी बसला हिरवी झेंडी दाखवल्यानंतर काही महिलांनी बसमध्ये चढण्यासाठी गर्दी केली.
- बसमध्ये चढण्यासाठी रागेंत असलेल्या एका महिलेला गौर यांनी चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला.
- गौर यांच्या गैरवर्तवणुकीवर पीडित महिलेने गौर यांच्याकडे वळून पाहिले. नंतर ती बसमध्ये चढली. तितक्यात गौर यांनी तिला मागून पुन्हा थपकी मारली.

कॉंग्रेसने जाळला गौर यांचा प्रतिकात्मक पुतळा...
- बाबूलाल गौर यांचा कथित व्हिडिओ समोर आल्यानंतर राजकारण तापले आहे. कॉंग्रेसने गौर यांचा प्रत‍िकात्मक पुतळा जाळाला.
- दुसरीकडे, आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते गौर यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने करत आहेत.
- महिलांवरील अत्याचाराच्या घटना मध्य प्रदेशात जास्त का घडतात, हे या प्रकरणावरून स्पष्ट झाल्याचे 'आप'ने ट्वीट केले आहे.
- 'ट्विटर' यूजर्सने या व्हिडि्ओला रि-ट्वीट करून मोदी व शिवराज सिंह चौहान यांना गौर यांच्या विरोधात कारवाई करण्‍याची मागणी केली आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, मध्य प्रदेशचे गृहमंत्री बाबूलाल गौर यांनी कसा केला महिलेला स्पर्श... महिलेने कसे बघितले त्यांच्याकडे..... बघा या संपूर्ण वादग्रस्त घटनेचा व्हिडिओ.....