आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यसनमुक्ती केंद्रात उपचाराच्या नावाखाली लैंगिक छळ; गुप्तांगात टाकत होते टूथपेस्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्वॉल्हेर- पोलिसांनी येथील एका अवैध व्यसन मुक्ति केंद्रात छापा टाकून तिथे चालणार्‍या गोरखधंद्याचा पर्दाफाश केला आहे. केंद्रातील 53 पीडीत युवकांची सूटका केली आहे. उपचाराच्या नावाखाली युवकांचा लैंगिक छळ केला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

व्यसन सोडण्यासाठी केंद्रात आलेल्या युवकांचा मानसिक व शारीरिक छळ केला जात होता. टायलेटमध्ये त्यांना जेवण दिले जात होते. इतकेच नव्हे तर त्यांच्या गुप्तांगात टूथपेस्टचे रिकामे पाऊच टाकले जात असल्याची आपबिती पीडित युवकांनी पोलिसांना सांगितली. दरम्यान, पीडित युवकांची वैद्यकीय तपासणी करण्‍यात आली असून त्यांच्या सर्वांगावर जखमी आढळून आल्या आहेत. त्यांच्या उपचार सुरु आहेत.

सागरताल मार्गावरील सोहम व्यसन मुक्ति केंद्रात उपचाराच्या नावाखाली युवकांचा लैंगिक छळ केला जास्त असल्याचे तक्रार जिल्हाधिकारी डॉ. संजय गोयल यांच्याकडे करण्‍यात आली होती. गाजियाबाद येथील राहुल चौधरी व कपिल गर्ग हे दोन्ही भामटे हे व्यसन मुक्ति केंद्र चालवत होते. पोलिसांनी केंद्राला सील ठोकले आहे.

नाव- व्यसन मुक्ति केंद्र
काम- उपचाराच्या नावाखाली यातना

-बहोडापूर भागातील सोहम व्यसन मुक्ति केंद्रात उपचाराच्या नावाखाली मागील काही वर्षांपासून युवकांचा मानसिक व शारीरिक छळ सुरु होता.
- कधी-कधी तर युवकांचे हातपाय बांधून त्यांना उलटे लटकवले जात होते. टॉयलेटमध्ये जेवण दिले जात होते.
- व्यसन सोडण्याच्या नावाखाली त्यांना बेदम मारहाण केली जात होती.
- राहुल चौधरी व कपिल गर्ग हे दोन्ही भामट्यांनी हे अवैध व्यसनमुक्ती केंद्र सुरु केले होते.
-युवकांना त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासही बंदी होती.
-युवकांच्या कुटुंबियांकडून 10 हजार रुपये प्रति महिला शुल्क आकरले जात होते. औषधींसाठी वेगळे पैसे उकळले जात होते.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणिFacebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...