आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यापमं: MasterMindच्या घरात 2 किलो सोने-गादीत ठेवले होते 13 लाख रुपये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ. सागरला कोर्टात हजर केले गेले तेव्हा. - Divya Marathi
डॉ. सागरला कोर्टात हजर केले गेले तेव्हा.
इंदूर - मध्यप्रदेशमध्ये सरकारी नोकरी आणि पीएमटी सारख्या प्रोफेशनल कोर्ससाठी परीक्षा घेणारी संस्था व्यावसायिक परीक्षा मंडळच्या (व्यापमं) घोटाळ्याची सध्या देशभर चर्चा सुरु आहे. सुप्रीम कोर्टाने या घोटाळ्याच्या चौकशीची जबाबदारी सीबीआयला दिली आहे. आतापर्यंत या घोटाळ्याशी संबंधीत 48 लोकांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचीही माध्यमात चर्चा होती. या घोटाळ्याची व्याप्ती किती होती, याचा नमुना एका डॉक्टरच्या घरावर टाकलेल्या धाडीत सापडलेल्या दोन किलो सोने, लोखोची रोकड, पैसे मोजण्याचे यंत्र, 40 तोळे हिऱ्यांचे दागिणे आणि एमबीबीएसच्या अॅ़मिशनसाठी त्याच्या डायरीत असलेल्या 317 नावांवरुन येऊ शकते.
मेडिकल कॉलेजमध्ये बनावट अॅडमिशनचा धंदा सुरु करणारा डॉ. जगदीश सागर याच्या घरावर जेव्हा पोलिसांचा छापा पडला तेव्हा तो ज्या गादीवर झोपत होता त्यात 13 लाखांची रोकड सापडली होती. एवेढेच नाही तर, या डॉक्टरच्या कुटुंबातील 28 लोकांना त्याने अशाच पद्धतीने डॉक्टर केले होते. त्यात त्याची पत्नी सुनीताचाही समावेश होता. गेल्या 15 वर्षांमध्ये डॉ. सागरने राज्यातील मेडिकल कॉलेजमध्ये एक हजारांपेक्षा जास्त बनावट अॅडमिशन करुन दिले होते.
सागरला विदेशी दारु आणि बंदूकींचा छंद
क्राइम ब्रँचचे तत्कालिन अतिरिक्त पोलिस आयुक्त दिलीप सोनी यांनी सांगितले की, मुळचा ग्वाल्हेर येथील डॉ. जगदीश सागर स्वतः पैसे देऊन डॉक्टर झाला आणि नंतर त्यानेच हा गोरख धंदा सुरु केला. इंदूर पोलिसांनी डॉ. सागरला जुलै 2013 मध्ये अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली तेव्हा त्यांना धक्का बसला. पोलिसांच्या माहितीनूसार, डॉ. सागरच्या घरातून 13 लाख रुपेय रोख सापडले. त्यान हे पैसे तो झोपत असलेल्या स्पेशल गादीत लपवून ठेवले होते. अतिरिक्त पोलिस आयुक्त सोनी यांच्या म्हणण्यानूसार, त्याच्या घरातील प्रत्येक रुमला बायोमेट्रिक लॉक होते. ते फक्त त्याच्या आणि त्याच्या पत्नीच्या फिंगर प्रिंटनेच उघडत होते. रोख रकमेशिवाय घरात पैसे मोजण्याचे यंत्र, 40 तोळ्यांहून अधिक हिऱ्यांचे दागिणे, वेगवेगळ्या डिझाइनच्या तलवारी, विदेशी बनावटीच्या पिस्तूल, एअरगन, सव्वाशे जिवंत काडतूस आणि विदेशी दारू जप्त केली होती. त्यानंतर त्याचे लॉकर उघडण्यात आले त्यात दोन किलो सोने आणि तीन लाख रुपये रोख सापडले होते.

पाच पॅनकार्ड, आठ कार आणि अब्जोंच्या दौलतीचा सागर
पोलिस तपासात डॉ. सागरच्या संपत्तीचा जसजसा उलगडा होत गेला तसतसे पोलिसांना त्याच्या संपत्तीचा सागर किती मोठा आहे हे कळत गेले. त्याच्या मालमत्तेचा शोध घेत पोलिस भिंड जिल्ह्यातील त्याच्या मुळ गावी पोहोचले. तिथे सागरच्या कुटुंबीयांच्या नावे शेकडो एकर जमीनीची कागदपत्रे सापडली. इंदूर आणि ग्वाल्हेरमध्ये एका मर्सिडीजसोबत पोलिसांनी त्याच्या आठ कार जप्त केल्या. समाजात डॉक्टर बनून उजळ माथ्याने वावरणारा सागर गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता याचा दुसरा पुरावा म्हणजे त्याच्याकडे सापडलेले पॅन कार्ड. सागर आणि त्याच्या पत्नीच्या नावाने पाच पॅनकार्ड तयार केलेले होते. त्याचा उपयोग करुन त्याने विविध बँकांमधून लाखो रुपये कर्ज घेतले होते. त्यासाठीही त्याने बनावट कागदपत्रेच सादर केली होती.
2013 मध्ये करणार होता 317 बनावट अॅडमिशन
जुलै 2013 मध्ये सागरला अटक झाली. तेव्हा त्याच्याकडील डायरी जप्त करण्यात आली होती. त्यात त्याने 2013 मध्ये पीएमटीसाठी 317 विद्यार्थ्यांचे अॅडमिशन करण्याचे कॉन्ट्रॅक्ट घेतले होते. या 317 विद्यार्थ्यांची नावे त्याच्या डायरीत लिहिलेली होती. पोलिस तपासात त्याने मान्य केले होते, की 1998 पासून तो हे काम करत आहे आणि प्रत्येक अॅडमिशनसाठी 15 ते 25 लाख रुपये घेत होता. सागरने व्यापमंच्या नितीन महिंद्राला बनावट अॅडमिशन कसे करायचे याची विद्या दिली होती. सध्या सागर भोपाळ तुरुंगात बंद आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, संबंधित छायाचित्रे