आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: महाकाल मंदिरात शिरले पाणी, अर्ध्या बुडालेल्या शिवलिंगाची केली भस्म आरती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उज्जैन /मंदसौर /इंदूर - मध्यप्रदेशात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. उज्जैनमध्ये मंगळवारी सकाळी कोटितीर्थ कुंडाचे पाणी महाकाल मंदिराच्या गर्भगृहापर्यंत जाऊन पोहोचले. मंदिरातील शिवलिंग अर्धे पाण्यात बुडाले होते आणि त्याच स्थिती महाकाल भस्म आरती करण्यात आली.
हजारो वर्षानंतर दिसले असे दृष्य
भस्म आरतीनंतर गाभाऱ्यातील पाणी काढण्यासाठी मोटर लावण्यात आली. मंदिराशी संबंधीत लोकांचे म्हणणे आहे, की हजारो वर्षांनंतर असे घडले आहे. उल्लेखनिय बाब म्हणजे कोटितीर्थ कुंडाच्या पाण्यानेच महाकालला जलाभिषेक करण्यात येतो.
मुहूर्त टळू नये म्हणून पाण्यात बुडालेल्या महाकालची भस्म आरती
मंदिराचे ज्येष्ठ पुजारी रमन त्रिवेदी म्हणाले, 'महाकालची भस्म आरती नेहमी ब्रम्हमुहूर्तावर होते. मंगळवारी सकाळी गाभाऱ्यात प्रवेश केला तेव्हा महाकाल पाण्यात बुडाल्याचे पाहिले. आरतीचा मुहूर्त टळू नये म्हणून शिवलिंग पाण्यात बुडालेले असतानाच भस्म आरती करण्यात आली. कारण पाणी काढण्यात वेळ गेला असता आणि मुहूर्त टळला असता.'
मंदसौरमध्ये पशुपतीनाथ मंदिरात पाणी
मालवांचल येथे झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे मंदसौर येथील पशुपतिनाथ मंदिरापर्यंत पाणीच पाणी झाले आहे.

शिप्राच्या किनाऱ्यावरील अनेक मंदिरांमध्ये अजूनही पाणीच पाणी
उज्जैनमध्ये सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे शिप्रा आणि गंभीर या दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीचा प्रवाह एवढा वेगवान आहे, की कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकते. नदी किनाऱ्यावरील सर्व मंदिरांमध्ये पाणी साचले आहे. अंगारेश्वर महादेव मंदिरासारख्या अनेक मंदिरांचे तर फक्त कळस दिसत आहेत.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, पाण्यात बुडालेल्या महाकाल मंदिरात सुरु असलेली भस्म आरती आणि इतर फोटोज...