आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahatma Gandhi's Grand Daughter Praise Swachchha Bharat Abhiyan, DIvya Marathi

महात्मा गांधींच्या नातीकडून स्वच्छ भारत मोहिमेचे कौतुक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर - महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेले स्वच्छ भारत अभियान एक महत्त्वपूर्ण प्रयत्न असल्याचे गौरोद्गार बापूंची नात सुमित्रा गांधी-कुलकर्णी यांनी काढले आहेत. ही एक महत्त्वाकांक्षी मोहीम असून देश कोणत्या दिशेने जात आहे, हे यातून दिसते.

८४ वर्षीय सुमित्रा म्हणाल्या, देशात सरकारी स्तरावर स्वच्छतेची सुरुवात महत्त्वपूर्ण पाऊल आहे. देशाची वाटचाल कोणत्या दिशेने होत आहे, याचे संकेत यातून मिळतात. स्वच्छ भारत अभियान महत्त्वाचे काम आहे. सरकारलाही ते पटले आहे. लोकांचा सहभाग वाढावा यासाठी पंतप्रधानांनीही आवाहन केले आहे. मोहिमेत सहभागी होण्यास स्त्रीशक्ती नकार देणार नाही. आपला आसपासचा परिसर स्वच्छ असावा याची जाणीव आपणास झाली आहे. माझ्या आजोबांनी स्वावलंबन आणि स्वच्छतेसाठी नेहमी प्रेरणा दिली.