आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: बस-ट्रकच्या भीषण धडकेत 25 ठार, मृतदेह-सामान 200 मीटर उडाले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खंडवा (मध्य प्रदेश)- खंडवा-इंदूर मार्गावरील छैगांवजवळ काल (बुधवार) सायंकाळी सुमारे 5.45 वाजता भरधाव ट्रक आणि बसची समोरासमोर भीषण धडक झाली. यात ट्रक आणि बसची अगदी चक्काचूर झाले. धडक एवढी जोरदार होती, की 17 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेत असताना 8 प्रवाशांवर काळाने झडप घातली. यात अपघातात 20 पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी जखमी प्रवाशांना बसबाहेर काढून रुग्णालयात पाठवले.
प्रवासी बस इंदूर येथून खंडवाला जात होती. ट्रक खंडव्याहून येत होता. छैलांगजवळ भरधाव असलेल्या ट्रकने बसला समोरासमोर जोरदार धडक दिली. याचा आवाज दूरवर ऐकू गेला. त्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली.
वस्तू 200 मीटर फेकल्या गेल्या
अपघाताचा जोरदार आवाज आल्यावर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी प्रवाशांना बसबाहेर काढण्यास सुरवात केली. अपघात एवढा भीषण आहे, की बहुतांश प्रवाशांचे मृतदेह ओळखण्यापलीकडे छिन्नविच्छिन्न झाले आहेत. प्रवासाच्या वेळी जे यात्रेकरु बसच्या केबिनमध्ये बसले होते त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर प्रवाशांच्या वस्तू जवळपास 200 मीटर अंतराच्या परिसरात फेकल्या गेल्या आहेत.
ट्रकचा ड्रायव्हर स्टेअरिंगमध्ये फसला
बसप्रमाणेच ट्रकही चक्काचूर झाला आहे. ट्रकचा ड्रायव्हर स्टेअरिंगमध्ये फसला होता. पोलिसांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्याच्या पोटात स्टेअरिंग गेले होते. पोलिसांनी त्याला लगेच रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
पुढील स्लाईडवर बघा, या भीषण अपघाताचे हृदयाचा थरकाप उडवणारे फोटो....