आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

होळीला राहा सावध, वॉशिंग पावडरपासून असा बनतो भेसळ खवा, बघा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्वाल्हेर - होळी सण जवळ आल्याने ग्वाल्हेर-चंबळच्या अनेक भागात भेसळ खवा बनवण्‍याला वेग आला आहे. दुधात युरिया व्यतिरिक्त डिटर्जंट पावडर आणि खराब वनस्पती तुप मिसळून खवा तयार केले जाते. खव्याच्या नावावर तुम्ही काय खात पाहा...
- सिंथेटिक दुध बनवण्‍यासाठी केवळ 10 ग्रॅम वॉशिंग पावडर, 800 एमएल तेल आणि 200 मिली दूध मिसळवले जाते.
- यात पाणीही टाकले जाते. एक लीटर दुधापासून 20 लीटर सिंथेटिक दुध बनवले जाते. यापासून खवाही तयार केला जातो.
- हा खवा तयार झाल्यानंतर ते कोलकातापासून ओडिशा ते चेन्नईपर्यंत रेल्वेने पाठवले जाते.
भेसळ खव्याची बाजारपेठ आहे ग्वाल्हेर
- पूर्ण देशात हा मावा ग्वाल्हेरमधून पुरवला जातो. येथील मोर बाजार सर्वात मोठे ठिकाण आहे.
- सिंथेटिक दूधापासून बनलेला खवा केवळ 150 रुपये किलो विकले जाते. मात्र सणोत्सवात हाच दर 300 रुपयांवर जातो.
होळीत विकला जाणार 200 टन खवा
उत्तर प्रदेशला लागून मुरना आणि भिंडच्या सीमावर्ती गावांमध्‍ये सिंथेटिक खवा तयार होत आहे. ते ग्वाल्हेरच्या मंडाईतून देशभरात पुरवले जाते. बाजारातील आकडेवारीनुसार 200 टनांपेक्षा अधिक खव्यापासून बनवलेले वेगवेगळे मिठाईचे पदार्थ होळीमध्‍ये खपवले जाणार आहे.
दुध उत्पादन कमी, मात्र खवा बनतो जास्त
अंचलमध्‍ये प्रत्येक दिवशी 10 लाख लीटर दूधाचे उत्पादन होते. मात्र बाजारातील खव्याची मागणी पूर्ण करण्‍यासाठी 12 ते 14 लाख लीटर दूध प्रत्येक दिवशी आवश्‍यक असते. जास्त मागणी भेसळ खव्याने पूर्ण केली जाते.
असे ओळखा
भेसळ खवा किंवा मिठाई ओळखण्‍यासाठी टिंचर आयोडीनची पाच ते सात थेंब आणि पाच ते सात साखराचे दाणे गरम करावे. जर खवा भेसळयुक्त असेल तर रंग बदलेल.
पुढील स्लाइड्सवर पाहा छायाचित्रे आणि व्हिडिओ...